स्वत:ला अत्यंत हुशार व चलाख समजत होता 'हा' डॉन..पण शेवटी..

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

 तो वेगवेगळ्या संशयितांना घेऊन गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. 2018 पासून तो फरारी झाला होता. संशयित अतिशय हुशार व चलाख असल्याने गुन्हा केल्यानंतर तो लगेचच परराज्यात पळून जात होता. त्यामुळे अनेक वेळा प्रयत्न करूनही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सुरत, अहमदाबाद आदी भागांत पथक पाठविले.

नाशिक : मालेगाव शहरातील विविध पोलिस ठाण्यांत तब्बल 37 गुन्हे दाखल असलेल्या व 12 गुन्ह्यांमध्ये फरारी असलेल्या ताहिर जमाल शहीद जमाल ऊर्फ ताहिर डॉन (वय 30, रा. गोल्डननगर) याला पोलिसांनी सुरत येथून अटक केली. ताहिरविरुद्ध येथील आयेशानगर, पवारवाडी, रमजानपुरा, किल्ला, कॅम्प, मालेगाव शहर व छावणी अशा पोलिस ठाण्यांत जबरी चोरी, दरोडा, घरफोडी, चोरी, खंडणी व खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर स्वरूपाचे 37 गुन्हे दाखल आहेत. 

चलाख असल्याने गुन्हा केल्यानंतर तो लगेचच परराज्यात पळून जायचा
ताहिर वेगवेगळ्या संशयितांना घेऊन गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. 2018 पासून तो फरारी झाला होता. संशयित अतिशय हुशार व चलाख असल्याने गुन्हा केल्यानंतर तो लगेचच परराज्यात पळून जात होता. त्यामुळे अनेक वेळा प्रयत्न करूनही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सुरत, अहमदाबाद आदी भागांत पथक पाठविले. ताहिर जमाल, अमीन शहा अरमान शहा ऊर्फ अम्मू (वय 21, रा. सलीमनगर) व शेख अतिक शेख अमिन (24, सुरत) या तिघांना सुरत येथून अटक करण्यात आली. 

Image may contain: 5 people, people standing

सदतीस गुन्ह्यांतील संशयित ताहिर जमालला अटक 
महिन्यापूर्वी येथील सराफाकडून लाखो रुपयांचा ऐवज पळवून नेणाऱ्यात या तिघांचा समावेश आहे. ताहिर या प्रकरणातील मुख्य संशयित आहे. छावणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ताहिरला प्रांताधिकाऱ्यांनी 21 मे 2018 ला एक वर्षासाठी नाशिक जिल्ह्यातून हद्दपार केले होते. मात्र, तो फरारी असल्याने त्याच्यावर या आदेशाची अंमलबजावणी करता आली नाही. तिघा संशयितांना अटक केल्यानंतर अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू, पोलिस नाईक गोरक्षनाथ संवत्सकर, हवालदार देवीदास गोविंद, हेमंत गिलगिले, सचिन धारणकर, दिनेश पवार, संजय पाटील, संदीप राठोड आदींच्या पथकाने केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tahir Jamal arrested on suspicion of crime Nashik Marathi News