घरी जाऊन साक्षीदाराला  जीवे मारण्याची धमकी 

घरी जाऊन साक्षीदाराला  जीवे मारण्याची धमकी 


जळगाव : गणेशवाडीत चार वर्षांपूर्वी चंद्रकांत पाटील यांचा खून झाला होता. या प्रकरणाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अश्‍वीन अशोक राणे आहेत. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू असून उद्या 7 मार्चला साक्ष देऊ नये, यासाठी तिघांनी त्यांच्या घरी जाऊन आमच्या विरोधात साक्ष दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अश्‍लील शिवीगाळ केली आहे. 

याप्रकरणी संशयित सनी ऊर्फ चाळीस वसंत पाटील (रा. रामेश्वर कॉलनी), सोनू ऊर्फ ललित गणेश चौधरी (ईश्वर कॉलनी) व मोहिनीराज अशोक कोळी (रा. सबजेलच्या पाठीमागे, जळगाव) यांच्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
अश्‍वीन राणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, गणेशवाडीत 2015 मध्ये गल्लीत राहणारे चंद्रकांत सुरेश पाटील यांचा सनी ऊर्फ चाळीस वसंत पाटील, सोनू ऊर्फ ललित गणेश चौधरी, चेतन सुरेश आळंदे, लखन ऊर्फ बोबड्या दिलीप मराठे, लक्ष्मण दिलीप शिंदे, सागर वासुदेव पाटील या सहा जणांनी भोसकून खून केला आहे. याचा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून पोलिसांनी जबाब नोंदविला आहे. याबाबत 7 मार्चला साक्षची तारीख दिली आहे. 5 मार्चला दुपारी साडेबाराला सनी ऊर्फ चाळीस वसंत पाटील (रा. रामेश्वर कॉलनी), सोनू ऊर्फ ललित गणेश चौधरी (ईश्वर कॉलनी) व मोहिनीराज अशोक कोळी (रा. सबजेलच्या पाठीमागे, जळगाव) यांनी घरासमोर येऊन 7 मार्चला साक्ष आहे. तू जर विरोधात साक्ष दिली तर जिवंत ठेवणार नाही. यावर मी साक्ष देणारच असे राणे रागावून म्हटला असता या तिघांनी अश्‍लील शिवीगाळ केली. 

अपर पोलिस अधीक्षकांना निवेदन 
अश्विन राणे यांनी अप्पर पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांचीही भेट घेऊन मी साक्ष देण्यास तयार आहे मात्र संशयित चेतन आळंदेसह त्याचे साथीदार वारंवार धमकावीत आहेत. भविष्यात माझ्या परिवाराला काही झाल्यास त्यास चेतन आळंदे ऊर्फ चिंग्या, सागर वासुदेव पाटील, सोनू ऊर्फ ललित गणेश चौधरी, सनी ऊर्फ चाळीस वसंत पाटील, लखन दिलीप मराठे ऊर्फ बोबड्या, लक्ष्मण ऊर्फ लक्ष्या दिलीप शिंदे व जामिनावर सुटलेले आरोपी जबाबदार राहतील असे तक्रारीत म्हटले आहे. 

नातेवाइकांनाही धमकी 
शहरातील एका खासगी रुग्णालयात अश्विनची आई लताबाई यांच्यावर उपचार सुरू आहेत. तेथेही नातेवाइकांना संशयितांनी साक्ष देऊ नये यासाठी दम भरला. या धमकीमुळे अशोक राणे यांनी न्यायालयात अर्ज दिला. पोलिसांनी न्यायालयात अडवून धरल्याचाही उल्लेख या अर्जात केला आहे. दरम्यान, आरोपीनेही माझे व वकील नसल्याने साक्ष घेऊ नये अशी विनंती केली आहे. 
......................... 
कोट... 
या खून खटल्यात अशोक राणे हा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. त्याला सतत धमक्‍या येत आहेत. आजही न्यायालयात अर्ज देण्यासाठी आला असता काही संशयित दिसून आले कामात अडथळा येऊ नये यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्याशी चर्चा करून पोलिस बंदोबस्त मागविला. 
-केतन ढाके, जिल्हा सरकारी वकील 
...........
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com