भ्रष्टाचारी कार्यकारी अभियंत्यांसह, उपअभियंता व सहाय्यक अभियंत्यांवर कारवाई करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

येवला : सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून रस्ता दुरुस्ती, खड्ड्यांंची डागडुजीसह इतर कामाची चौकशी करून भ्रष्टाचार करणार्‍या कार्यकारी अभियंत्यांसह 
उपअभियंता व सहाय्यक अभियंत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी येथील प्रांत कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने आज गुरुवार बेमुदत उपोषण करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता एस. एम. देवरे व  उपअभियंता यु. जी. पाटील यांनी या कामाची चौकशी सुरु झाल्याबाबत लेखी पत्र दिल्याने सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले. 

येवला : सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून रस्ता दुरुस्ती, खड्ड्यांंची डागडुजीसह इतर कामाची चौकशी करून भ्रष्टाचार करणार्‍या कार्यकारी अभियंत्यांसह 
उपअभियंता व सहाय्यक अभियंत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी येथील प्रांत कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने आज गुरुवार बेमुदत उपोषण करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता एस. एम. देवरे व  उपअभियंता यु. जी. पाटील यांनी या कामाची चौकशी सुरु झाल्याबाबत लेखी पत्र दिल्याने सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले. 

पंचायत समितीचे माजी सभापती, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक संभाजीराजे पवार यांच्यासह शिवसैनिकही सहभागी झाले होते. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतुन तालुका अंतर्गत महामार्गावरील रस्त्यांचे खड्डे बुजविण्याचे काम गेल्या चार पाच महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली खड्डे बुजविताना बांधकाम विभागातील मैल कामगारांचा वापर करीत काही ठेकेदारांच्या नावाखाली कार्यकारी अभियंता, उपअभियंता व सहाय्यक अभियंता यांनी ही कामे स्वत:च करुन घेतली.

कमी डांबराचा वापर करीत अधिकार्‍यांनी मार्गांवरील खड्डे बुजवितांना उर्वरीत डांबराची परंस्पर विक्री करुन विल्हेवाट लावल्याची तक्रार संभाजी पवार यांनी निवेदनाद्वारे मुख्य अभियंत्यांकडे केली होती. याबरोबरच मालेगाव- मनमाड- कोपरगाव या राज्य महामार्गाचे बांधकाम विभागाच्या नियमाअन्वये बीओटी तत्वावर पाच वर्षाच्या कालावधीत संपूर्ण डांबरीकरण करणे आवश्यक असताना नागपूर येथील इन्फ्रास्ट्रक्चर टोल कंपनीने सदरचे डांबरीकरण केले नाही. यासह सन २०१४ मध्ये विशेष दुरुस्तीच्या नावाखाली सुमारे ४ कोटी रुपयाची बिले बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी ठेकेदारांच्या नावाखाली संगनमताने काढून शासकिय निधीचा भ्रष्टाचार केला.

पर्यटन योजनेअंतर्गत अनकुटे, सावरगाव, देवीचे व विठ्ठलाचे कोटमगाव, अंदरसूल आदी कामात शासकिय निधीची अफरातफर झाली आहे. पैठणी हस्तकला केंद्र व पैठणी विक्री केंद्राच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. ज्या ठेकेदारांशी साटे लोटे आहे अशांच्या संगनमताने त्यांच्या नावावर कामे देउन बीले काढणे व सर्वसामान्य ठेकेदारांनाबीलासाठी वेठीस धरणे, अडवणूक करणे आदी प्रकार होत आहेत. या सर्व प्रकाराची त्वरीत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. या विविध मागण्यांसाठी प्रांत कार्यालयासमोर आज गुरुवारी शिवसेनेने बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती.

प्रांताधिकारी भिमराज दराडे यांनी शिवसेनेचे संभाजी पवार यांच्याशी बोलणी केली.यावेळी एक महिन्यात या कामांची चौकशी करण्याचे लेखी आस्वासन बांधकाम विभागाकडून देण्यात आले.त्यानंतर सायंकाळी उशिरा उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रतन बोरणारे, पंचायत समितीचे शिवसेनेचे गटनेते ऍड. मंगेश भगत, सदस्य रुपचंद भागवत, प्रविण गायकवाड, छगन आहेर, उपजिल्हा प्रमुख वाल्मिक गोरे,कांतिलाल साळवे,शरद लहरे, विठ्ठलराव आठशेरे, अरुण काळे, रवी काळे, मनोज रंधे, रामनाथ कोल्हे, संजय पगारे, सर्जेराव सावंत, विठ्ठलराव जगताप, बाळासाहेब पिंपरकर,  विलास रंधे, रावसाहेब ठोंबरे, ऍड. बापुसाहेब गायकवाड, आप्पासाहेब खैरनार, विजय शिंदे, नितीन जाधव, सुभाष सोनवणे, कुणाल धुमाळ, दिपक जगताप, भाउसाहेब गरुड, पी. के. काळे, लक्ष्मण पवार, दत्ता आहेर, गोविंद गायके आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
विशेष म्हणजे यापूर्वी देखील चौकशीचे आस्वासन देण्यात आले होते.या मागणीसाठी चौकशी करण्याच्या आश्वासनाला महिना उलटला तरी देखील कोणत्याही प्रकारची कारवाई झाली होत नसल्याने संभाजीराजे पवार यांच्यासह शिवसैनिकांनी उपोषण सुरु केले होते.

Web Title: take action on executive engineer Deputy engineer assistant engineer for corruption