सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील तलाठी...अन् इतक्या रकमेची लाच मागितली..पुढे..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

तक्रारदार शेतकऱ्याचे आई-वडील दोन वर्षांपूर्वी मृत झाले होते. त्यांचे नावावरील शेतीला वारसदार म्हणून नाव लावण्यासाठी तलाठ्याकडे त्यांनी वारंवार चकरा मारल्या. नाव लागले नसल्याने शेतीला मिळणारे अनुदान, पीकविमा, कर्ज मिळत नव्हते. दोन वर्षांचा दुष्काळ व यंदा अतिवृष्टी यामुळे घायकुतीस आलेल्या तक्रारदाराने तहसीलदारांकडे सुद्धा चकरा मारल्या होत्या. परंतु त्यांनीही दाद दिली नव्हती.

नाशिक : चार महिन्यांनी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेला तलाठी लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात आज अलगद अडकला. मांडवड सज्जेचा तलाठी राजकुमार उत्तमराव देशमुख शेतकऱ्याकडे सातबाराच्या उताऱ्यावरील वारसाची नोंद करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना पकडला गेला. 

असे पकडले रंगेहाथ...

शासनाकडून आलेले अनुदान खात्यावर आले असताना सातबाराच्या उताऱ्यावर वारसाची नोंद लावण्याची मागणी शेतकऱ्याने केली होती. त्यासाठी तलाठी देशमुख यांनी तीन हजारांची लाच मागितली होती. पंधराशे रुपयांच्या तडजोडीवर हा व्यवहार ठरल्यानंतर शेतकऱ्याने तक्रार नोंदविताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक सुनील पाटील, हवालदार सुभाष हांडगे, राजेंद्र गिते, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने देशमुख याला रेल्वे फाटकाजवळील रिक्षा स्टॅन्डवर पैसे स्वीकारताना पकडले. 

Image may contain: one or more people, sunglasses, eyeglasses and closeup

photo : तलाठी राजकुमार उत्तमराव देशमुख

हेही वाचा > PHOTO : ऍपलचे शोरूम फोडले...सुरक्षारक्षकांचा वावर असूनही 'अशी' केली चोरांनी हिम्मत..

अतिवृष्टीमुळे घायकुतीस आलेल्या तक्रारदाराच्या तलाठीकडे चकरा

तक्रारदार शेतकऱ्याचे आई-वडील दोन वर्षांपूर्वी मृत झाले होते. त्यांचे नावावरील शेतीला वारसदार म्हणून नाव लावण्यासाठी तलाठ्याकडे त्यांनी वारंवार चकरा मारल्या. नाव लागले नसल्याने शेतीला मिळणारे अनुदान, पीकविमा, कर्ज मिळत नव्हते. दोन वर्षांचा दुष्काळ व यंदा अतिवृष्टी यामुळे घायकुतीस आलेल्या तक्रारदाराने तहसीलदारांकडे सुद्धा चकरा मारल्या होत्या. परंतु त्यांनीही दाद दिली नव्हती.

नक्की बघा > PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...

हेही वाचा > पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने..

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच..

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talathi arrested for taking bribe Nashik Crime Marathi News