तनिष्कांतर्फे आरोग्य केंद्रातील गरजू रुग्णांना मोफत भोजन

प्रा. भगवान जगदाळे
मंगळवार, 22 मे 2018

जैताणेत तनिष्का गटाची स्थापना, अध्यक्षपदी मोहिनी जाधव

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील तनिष्कांतर्फे सोमवारी (ता. २१) दुपारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गरजू रुग्णांना मोफत भोजन व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. आगामी काळात तनिष्का गटातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील बाहेरगावच्या गोरगरीब, गरजू रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अल्पशा, माफक दरात, नाममात्र शुल्कात भोजनाचे डबे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सरपंच संजय खैरनार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सयाराम पावरा, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित पावरा व तनिष्का गटाच्या अध्यक्षा मोहिनी जाधव, सदस्या शुभांगी धारणे, सीमा भदाणे, अर्चना वानखेडे, नलिनी जाधव, सुनीता महाले आदींसह रुग्णालयाचे कर्मचारी, आशा सेविका, रूग्ण, रुग्णांचे नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गटप्रमुख मोहिनी जाधव यांनी तनिष्का गटातर्फे सरपंच संजय खैरनार यांचा सत्कार केला. सरपंच खैरनार, डॉ. रणजित पावरा, डॉ. सयाराम पावरा, गटप्रमुख मोहिनी जाधव, सदस्या नलिनी जाधव, शुभांगी धारणे, सीमा भदाणे, सुनीता महाले, सोनाबाई जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. 'ना नफा, ना तोटा' तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. माळमाथा परिसरातील गरजू, गोरगरीब रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी (९८९००६३०५०) या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे तनिष्कांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीच्या दातृत्वातून तनिष्का गटाची स्थापना...
जैताणे ग्रामपंचायतीच्या दातृत्वातून व सरपंच संजय खैरनार, ग्रामविकास अधिकारी योगेंद्र सोनवणे यांच्या सहकार्याने तनिष्का गटाची स्थापना झाली. गटाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी गणेश जाधव यांची निवड झाली. तनिष्का सदस्या नलिनी छोटू जाधव, शुभांगी बाळकृष्ण धारणे, उषाबाई हरिभाऊ ठाकरे, सीमा छोटू भदाणे, कल्पना अजित बागुल, वर्षा प्रकाश वानखेडे, वैशाली किशोर वाघ, सुनीता मनोहर महाले, अर्चना मोहन वानखेडे आदी उपस्थित होत्या.

Web Title: tanishka group free food for needy patients in the hospital