तापी खोऱ्यातील जमिनीचे सर्वेक्षण सुरु

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

जळगाव - मध्य प्रदेश व महाराष्ट्राला लाभदायी ठरू शकणाऱ्या तापी नदीवर प्रस्तावित मेगा रिचार्ज (महाकाय जलपुनर्भरण) योजनेंतर्गत तापी नदीच्या खोऱ्यातील जमिनीचे हवाई सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्याचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला जाणार आहे. दोन राज्यांमधील आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या प्रकल्पासंबंधीची कार्यवाही सुरू झाल्याचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. या प्रकल्पासंबंधीच्या तांत्रिक बाबी, कार्यवाही पूर्ण करून लवकरच पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते भूमिपूजन कार्यक्रम उरकून घेतला जाईल, असेही चर्चिले जात आहे.
Web Title: Tapi River Land Survey