चिमुरडीला गळफास देऊन शेतकऱ्याचीही आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

तताणी (जि. नाशिक) - तताणी (ता. बागलाण) गावालगतच्या पिंपळेमाळ या आदिवासी वस्तीवरील आनंदा बापू चौरे (वय 40) याने स्वतःच्या साडेतीन वर्षांच्या मुलीला गळफास दिल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली.

तताणी (जि. नाशिक) - तताणी (ता. बागलाण) गावालगतच्या पिंपळेमाळ या आदिवासी वस्तीवरील आनंदा बापू चौरे (वय 40) याने स्वतःच्या साडेतीन वर्षांच्या मुलीला गळफास दिल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली.

तताणीलगत असलेल्या पिंपळेमाळ येथील आदिवासी वस्तीतील आनंदा बापू चौरे (वय 40) अनेक वर्षांपासून आरम नदीजवळ शेतात राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना मूतखड्याचा त्रास होता. छोट्या-मोठ्या आजारांमुळे ते त्रस्त होते. अनेक दिवसांपासून उपचार घेऊनही तब्येतीत सुधारणा होत नसल्याने ते निराश होते. आपल्या जाण्याने मुलीचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांनी शनिवारी (ता. 24) पहाटे साडेतीन वर्षांची चिमुकली वैशाली (राणी) हिला स्वतः गळफास दिला. नंतर त्याच दोरीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: tatani nashik news farmer suicide