भावी शिक्षकांची उद्या आयुक्त कार्यालयावर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

नाशिक - राज्यातील भावी शिक्षकांनी शिक्षक भरती होत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. 12) पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक - राज्यातील भावी शिक्षकांनी शिक्षक भरती होत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. 12) पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात डी. एड. आणि बी. एड. झालेल्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. शिक्षक भरतीसाठी परीक्षा घेऊन 14 महिने उलटले तरी घोषित केलेल्या 24 हजार जागांची भरती होत नाही. म्हणून बेरोजगार अभियोग्यताधारक संतप्त झाले आहेत. या संतापाचाच परिणाम म्हणून 12 फेब्रुवारी रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चात राज्यातील भावी शिक्षक बहुसंख्येने सहभागी होणार आहेत.

Web Title: Teacher Rally on Commissioner Office