शिक्षकभरतीत मराठा आरक्षण की फसवणूक?

प्रशांत कोतकर
सोमवार, 28 जानेवारी 2019

नाशिक - राज्यात मराठा समाजाला सीईबीसी प्रवर्गअंतर्गत १६ टक्के आरक्षण जाहीर झाले तदनंतर श्री. तावडे यांनी शिक्षकभरतीमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू होईल, ही घोषणा केली. १९ डिसेंबर २०१८ मध्ये मराठा आरक्षणनुसार बिंदुनामावली अद्ययावत करण्यासाठीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. त्यानुसार प्रत्येक भरतीप्रक्रियेत मराठा समाजाला सीईबीसी प्रवर्गाला एकूण जागांच्या १६ टक्के जागा देण्यात याव्यात, असे नमूद करण्यात आले आहे. हे नमूद केले असले तरीपण प्रत्यक्ष भरती प्रक्रियेअंती शून्य जागा भरल्या जातील, असे रोष्टरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

नाशिक - राज्यात मराठा समाजाला सीईबीसी प्रवर्गअंतर्गत १६ टक्के आरक्षण जाहीर झाले तदनंतर श्री. तावडे यांनी शिक्षकभरतीमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू होईल, ही घोषणा केली. १९ डिसेंबर २०१८ मध्ये मराठा आरक्षणनुसार बिंदुनामावली अद्ययावत करण्यासाठीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. त्यानुसार प्रत्येक भरतीप्रक्रियेत मराठा समाजाला सीईबीसी प्रवर्गाला एकूण जागांच्या १६ टक्के जागा देण्यात याव्यात, असे नमूद करण्यात आले आहे. हे नमूद केले असले तरीपण प्रत्यक्ष भरती प्रक्रियेअंती शून्य जागा भरल्या जातील, असे रोष्टरमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजातील अभियोग्यताधारकांमध्ये संतप्त वातावरण आहे. या भावी शिक्षकांनी दोन दिवसापूर्वी # शिक्षकभरती मराठा आरक्षण की फसवणूक कशी ट्‌विटरवर मोहीम राबवून संताप व्यक्त केला आहे. 

शिक्षकभरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येणाऱ्या काळात लोकसभा आचारसंहिताआधी शिक्षकभरती होईल, असे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत. शिक्षकभरतीमध्येही १६ टक्के आरक्षण लागू असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात एकूण जागांच्या १६ टक्के जागा सीईबीसी प्रवर्गाला येणे क्रमप्राप्त होते. पण अनेक जिल्ह्यात या जागा येताना दिसत नाहीत.

गडचिरोली, धुळे जिल्ह्यांत, तर सीईबीसीला शून्य जागा दाखविण्यात येत आहेत. याचा अर्थ मराठा समाजातील एक ही जागा या ठिकाणी भरली जाणार नाही. तसेच गोंदियामध्ये एकूण जागेच्या १६ टक्के जागा दाखविण्यात आल्या आहेत; पण प्रत्यक्षभरती प्रक्रियेअंती शून्य जागा भरल्या जातील, असे रोष्टरमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजातील भावी शिक्षकांमध्ये संतप्त वातावरण आहे.भावी शिक्षकांनी विविध अधिकाऱ्यांशी संपर्क करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली गेलीत. काही अधिकाऱ्यांनी खुल्या प्रवर्गातील अतिरिक्त शिक्षकांमुळे सीईबीसीला जागा येणार नाहीत, अशी उत्तरे दिलीत.

पण या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांमुळे मराठा समाजातील गुणवंतांचा बळी का घेतला जात आहे, त्यांना नोकरीपासून वंचित का ठेवला जात आहे, अशा संतप्त भावना भावी शिक्षकांनी व मराठा समाजातील समाज माध्यमात मराठा समाजाच्या प्रश्‍नावर कार्य करणाऱ्या विविध ट्‌विटरांकडून ट्रेंड मोहिमेत व्यक्त केल्या. तसेच मराठा समाजातील अभियोग्यताधारकांबरोबरच विविध समाजातील अभियोग्यताधारकांनी मराठा बांधवांची फसवणूक न करता शासनाने १६ टक्के नुसार जागा शिक्षकभरतीमध्ये देण्यात याव्यात, अशी एकसुरात मागणी केली. ही ट्रेंड मोहीम दोन दिवस चालली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher Recruitment Maratha Reservation Cheating