शिक्षकाच्या मरणोत्तरानंतरही घडले शैक्षणिक कार्य

दीपक कच्छवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

पारंपरिक जेवणावळींच्या पद्धतीला फाटा देत धामणगाव (ता.चाळीसगाव) येथील पवार कुटुंबीयांनी समाजासमोर आगळा वेगळा उपक्रम साकारला. आपल्या वडिलांनी ज्या शिक्षकी व्यवसायात आपले आयुष्य ज्ञानदानात खर्ची केले.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : धामणगाव( ता.चाळीसगाव) येथील सेवानिवृत्त शिक्षक (कै.) श्रीराम पवार यांच्या प्रथम स्मरणार्थ माध्यमिक विद्यालय सर्वोदय आश्रमशाळेत वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले आहे. 

पारंपरिक जेवणावळींच्या पद्धतीला फाटा देत धामणगाव (ता.चाळीसगाव) येथील पवार कुटुंबीयांनी समाजासमोर आगळा वेगळा उपक्रम साकारला. आपल्या वडिलांनी ज्या शिक्षकी व्यवसायात आपले आयुष्य ज्ञानदानात खर्ची केले. त्याच भावनेतून मरणोत्तरी देखील शैक्षणिक भावना जोपासण्याच्या हेतुने  सेवानिवृत्त शिक्षक  (कै.)श्रीराम केशवराव पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ येथील पवार कुटुंबीयांनी सर्वोदय माध्यमिक विद्यालयातील वस्तीगृहच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.

वह्या वाटपाची संकल्पना मुलगा नितीन पवार यांची आहे.तेही वडिलांप्रमाणे ज्ञानदानाचे कार्य करीत असून राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी वडीलांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना वह्या व पेन  वाटपाचा चांगला निर्णय घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एल. टी. सोनवणे, व्ही. के. निकम, बी. डी. पवार, पी. एस. पाटील, शिरसाठ, हेमंत पाटील, अधिक्षक गणेश सूर्यवंशी, सचिन पवार, प्रशांत पवार, सुनिल पवार, सुनिल जगताप, पंकज पवार अनिल पवार यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत होते.

Web Title: teacher social work in chalisgaon