यंदा शिक्षक बदल्या जिल्हास्तरावरूनच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

जळगाव - शासनाच्या नवीन निर्णयानुसार या वर्षापासून शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्यामुळे शिक्षक बदल्यांबाबत अवघड क्षेत्र व सोपे क्षेत्र याबाबत १७ एप्रिलपर्यंत माहिती सादर करण्याच्या सूचना आज झालेल्या बैठकीत गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

यंदा सर्व शिक्षकांच्या बदल्या जिल्हास्तरावरून होणार असून, सेवा-ज्येष्ठतेनुसार बदल्या होणार आहेत. यावर्षी ‘पेसा’ क्षेत्रातील १०० टक्के जागांवर शिक्षकांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत.  शिक्षक बदल्यांच्या प्रक्रियेला लवकरच सुरवात होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्या उपस्थितीत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात बैठक झाली. माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी डॉ. देवांग यांच्यासह सर्व तालुक्‍यांचे गटशिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती. सेवा-ज्येष्ठतानुसार बदलीप्राप्त शिक्षकांची अद्यावत माहिती गटशिक्षणाधिकारी यांनी १७ एप्रिल पर्यंत तयार करून सादर करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अवघड क्षेत्रात तालुका मुख्यालयापासून दूर व दळणवळणासाठी नसताना, पोहण्यासाठी सुविधा नसलेल्या शाळा, तसेच दुर्गम व डोंगराळ भागातील शाळा अवघड क्षेत्रात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

Web Title: teacher transfer on district lavel