एकदिवसीय विद्यार्थी-शिक्षकांनी घेतली प्रशासनासह अध्यापनाची अनोखी अनुभूती!

teachers day celebration in nijampur jaitane school
teachers day celebration in nijampur jaitane school

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहावी व अकरावी-बारावीच्या सुमारे शंभरावर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षक दिनानिमित्त एकदिवसीय शिक्षक-शिक्षकांची भूमिका पार पाडत प्रशासनासह अध्यापनाचा अनोखा अनुभव घेतला.

शिक्षक दिनानिमित्त आज (ता. 5) शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविधांगी भूमिका निभावल्या. विद्यार्थी-शिक्षकांनी इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गांमध्ये सकाळ-दुपार अशा दोन सत्रात सर्व विषयांच्या नियमित तासिका घेतल्या. विशिष्ट गणवेश व साडी परिधान केलेल्या विद्यार्थी शिक्षक-शिक्षकांच्या चेहऱ्यावर एकदिवसीय शिक्षक बनल्याचा उत्साह ओसंडून वाहत होता.

सर्वप्रथम शाळेच्या सकाळ शिफ्टचे विद्यार्थी-मुख्याध्यापक हृषीकेश ठाकरे, विद्यार्थिनी-उपप्राचार्या गायत्री धनगर, दुपार शिफ्टच्या विद्यार्थिनी-मुख्याध्यापिका प्रांजली राणे, विद्यार्थिनी-उपमुख्याध्यापिका संस्कृती पाटील, विद्यार्थिनी-पर्यवेक्षिका रश्मी वाणी, विद्यार्थी-पर्यवेक्षक गौरव महाले, संस्थेचे सचिव नितीन शाह, मुख्याध्यापक जयंत भामरे, उपमुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, सुरेश माळी, रामचंद्र सोंजे, शोभा उपाध्ये, प्रवीण शाह, कृष्णा लांडगे, भिकाजी गावित, सत्यनारायण शिरसाठ आदींनी भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सर्व विद्यार्थी-शिक्षकांनी इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गांवर सर्व विषयांच्या तासिका उत्साहाने घेतल्या. प्रार्थना व राष्ट्रगीतासह इतर सूचनाही क्रीडाशिक्षक व संगीतशिक्षक विद्यार्थ्यांनीच दिल्या. विद्यार्थी-शिक्षकांनी सर्व शिक्षक-शिक्षिकांचा गुलाबपुष्पे देऊन सत्कार केला.

मुख्याध्यापक भामरे, उपमुख्याध्यापक चौधरी, शिक्षक दिनेश तोरवणे, सखाराम सोनवणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विद्यार्थी-शिक्षकांनी शिक्षक दिनाच्या महत्वासह आलेले प्रशासन व वर्गाध्यापनाबद्दलचे अनुभव कथन केले. मुख्याध्यापक जयंत भामरे यांच्या हस्ते केक कापून शिक्षक दिनाचा समारोप झाला. बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी-शिक्षिका वैशाली न्याहळदे यांनी प्रास्ताविक केले. बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी-शिक्षिका शरयू गायकवाड व दहावीचा विद्यार्थी-संगीत शिक्षक अनुराग जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. बारावी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी-शिक्षिका पूजा माळी व दहावीची विद्यार्थिनी-पर्यवेक्षिका रश्मी वाणी यांनी आभार मानले. विद्यार्थी-शिक्षकांना समिती प्रमुख देविदास पाडवी, मदतनीस शिक्षक जितेंद्र सोनगिरे, सखाराम सोनवणे, दिनेश तोरवणे, रवींद्र सूर्यवंशी आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com