शिक्षकांची विद्यापीठाला दोन लाखाची देणगी

Dhule
Dhule

कापडणे (ता.धुळे) : बहिणाबाई चौधरी विद्यापीठ क्षेत्रातील वनस्पती शास्र्त विषयाच्या बारा प्राध्यापकांनी दोन लाखाची विद्यापीठाला आज (ता.24) देणगी दिली. या देणगीच्या व्याजातून प्रथम वर्ष एम. एस्सीला विद्यापीठात प्रथम येणार्‍या विद्यार्थीनीला सुवर्ण पदक दिले जाणार आहे. उत्तर महाराष्र्ट विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी असे नामकरण करण्यात आल्याने बारा प्राध्यापकांनी या विधायक उपक्रमाचा पायंड्यास सुरुवात केली आहे.

एम. एस्सी. वनस्पतीशास्त्र या विषयात या वर्षापासून विद्यापीठातून सर्वप्रथम येणाज्या विद्यार्थिनीस प्रा.आर.एम.पौ सुवर्णपदक दिले जाणार अाहे. या सुवर्णपदकासाठी दोन लाख रुपयांचे धनादेश कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरु प्रा. पी. पी. माहुलीकर, प्रा. ए. बी. चौधरी, डॉ. डी. ए. पाटील, डॉ. अजय पाटील, डॉ. वाय. ए. अहिरराव, प्राचार्य एम. व्ही. पाटील, डॉ. प्रविण पाटील, डॉ. शुभांगी पवार, डॉ. एस. के. तायडे, डॉ. एस. बी. खौरनार, डॉ. सी. आर. पाटील, डॉ.एस.आर.क्षीरसागर आदी उपस्थित होते.

लाखमोलाचे बारा प्राध्यापक
वनस्पतीशास्र्ताचे मार्गदर्शक आणि गुरुस्थानी असलेल्या प्रा. पौ यांच्या नावाने सुवर्णपदक दिले जावे यासाठी पुढील बारा प्राध्यापक मंडळींनी दोन लाखाची देणगी दिली आहे. यात  डॉ.डी.ए.पाटील, डॉ.अजय पाटील, डॉ.वाय.ए.अहिरराव, प्राचार्य एम.व्ही.पाटील, डॉ.प्रविण पाटील, डॉ.शुभांगी पवार, डॉ.एस.के.तायडे, डॉ.एस.बी.खौरनार, डॉ.सी.आर.पाटील, डॉ.एस.आर.क्षीरसागर, एच.बी. शिसोदे व प्रा.हेमंत ठाकूर यांचा समावेश आहे.

प्रा. पौ सुवर्णपदक
आंतरराष्ट्रीय किर्तीचे वनस्पतीशास्त्रज्ञ असा लौकिक असलेले प्रा.आर.एम.पौ हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  विभागप्रमुख होते.  इंडियन सायन्स काँग्रेस (वनस्पतीशास्त्र विभाग) आणि इंडियन बॉटनिकल सोसायटीचे अध्यक्षपदही त्यांनी भुषविले आहे. प्रा.पौ यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथील येथील डॉ.डी.ए.पाटील यांनी पीएच.डी.पदवी प्राप्त केली होती. डॉ.पाटील व त्यांचे सहसंशोधक  प्राध्यापक यांनी प्रा.पौ सन्मान सुवर्ण पदक पारीतोषीकाचा प्रारंभ करीत आहेत.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एम.एस्सी. वनस्पतीशास्त्र या विषयात सर्वप्रथम येणाज्या विद्यार्थिनीसाठी सुवर्णपदक स्थापित केले आहे. त्यासाठी दोन लाख रुपयांचा धनादेश कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

अलिकडेच विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी नाव देण्यात आले असून या अनुषंगाने प्रेरीत होऊन विद्यार्थिनींना विशेष प्रेरणा देण्यासाठी हे सुवर्णपदक स्थापित करण्यात आल्याचे प्राचार्य एम.व्ही. पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com