शिक्षकांच्या आंदोलनात समाजाला जोडणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जुलै 2016

जळगाव - अनेक वर्षांपासून विविध प्रश्‍नांसाठी शिक्षक आंदोलन करीत आहेत, मात्र त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आता शिक्षकांच्या विविध प्रश्‍नांवरील आंदोलनात आता पालक-विद्यार्थ्यांसह समाजालाही सहभागी करून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शैक्षणिक संघाच्या आज झालेल्या राष्ट्रीय परिषदेत घेण्यात आला.

जळगाव - अनेक वर्षांपासून विविध प्रश्‍नांसाठी शिक्षक आंदोलन करीत आहेत, मात्र त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आता शिक्षकांच्या विविध प्रश्‍नांवरील आंदोलनात आता पालक-विद्यार्थ्यांसह समाजालाही सहभागी करून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शैक्षणिक संघाच्या आज झालेल्या राष्ट्रीय परिषदेत घेण्यात आला.

राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे भगीरथ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षकांसाठी आयोजित राष्ट्रीय परिषद आज पार पडली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एज्युकेशनल असोसिएशनचे अध्यक्ष ब्रज नंदन शर्मा होते. तर महासचिव विवेकानंद दास, सचिव नब कुमार करमाकर, उपाध्यक्ष सुब्बा रेडी, मिथिलेश शर्मा, राम अवतार पांडे, अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष फिरोज बादशहा, आमदार डॉ. सुधीर तांबे, महाराष्ट्र शिक्षक फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर कानडे, पूर्णवाद विद्यापीठाचे कुलगुरू विद्याधर पानट, माजी प्राचार्या मंगला जंगले, इकरा संस्थेचे अध्यक्ष करीम सालार, मुख्याध्यापक शेख हरून, खानदेश एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रमोद चांदसरकर यांची व्यासपीठावर उपस्थित होते.

ब्रज नंदन शर्मा म्हणाले, की शिक्षकांच्या प्रश्‍नांवर आता देशात वादळ निर्माण व्हावे असे आंदोलन करावे लागणार आहे, त्यासाठी शिक्षकांनी सज्ज राहावे. माजी आमदार सुधीर तांबे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, बारावीपर्यंतच्या शिक्षणाला पायाभूत शिक्षण मानावे. शाळेत वीसपेक्षा कमी विद्यार्थी असल्यास, शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, तो पूर्णतः चुकीचा आहे. एका वर्गाला एक शिक्षक या धोरणामुळे शाळांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणे कठीण झाले आहे. शिक्षकांच्या प्रश्‍नात समाजाला सामावून घ्यावे असे आवाहन तांबे यांनी यावेळी केले. मुख्याध्यापक हारून शेख यांनी कार्यशाळेत आरटीई कायद्याची माहिती देत, या कायद्यातील त्रुटींबाबत माहिती दिली.

आंदोलनात समाजालाही जोडणार
राष्ट्रीय परिषद काही निर्णयही घेण्यात आले. शिक्षक संघटनांकडून विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलने करण्यात आलीत, परंतु शासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे भविष्यात या मागण्यांकडे शासनाने लक्ष द्यावे यासाठी. शिक्षकांच्या आंदोलनात समाज, पालक व विद्यार्थ्यांनाही जोडून घेण्यात येईल, आंदोलनाची माहीत समाजापर्यंत जावी यासाठी जिल्ह्यात शिक्षकयात्रा काढण्यात येणार असल्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Web Title: Teachers protest community join