शिक्षकांचे पगार आता मार्चपर्यंत ऑफलाइन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

इगतपुरी (जि. नाशिक) - राज्यातील खासगी अंशतः व पूर्णतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट 2018 ते मार्च 2019 या कालावधीतील वेतन ऑफलाइन पद्धतीने वितरित करण्याचे परिपत्रक शासनाने जारी केले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या रखडलेल्या पगाराचा मार्ग मोकळा झाला आहे. 

शालार्थ प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअरमध्ये 12 जानेवारीपासून तांत्रिक दोष निर्माण झाला असून, ही प्रणाली अद्याप सुरू झालेली नाही. राज्यातील खासगी अंशतः व पूर्णतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ क्रमांक मिळालेला आहे. शालार्थ क्रमांकासाठी पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्च 2019 पर्यंतचे नियमित व थकीत वेतन ऑफलाइन करण्यास सांगण्यात आले. अर्धवेळ, रजा कालावधीत नियुक्त तसेच तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे नियमित व थकीत वेतन ऑफलाइन पद्धतीने अदा करण्यास मान्यता देण्यात आली. याबरोबरच 1 व 2 जुलै 2016 च्या शासन निर्णयान्वये अनुदानासाठी पात्र घोषित केलेल्या राज्यातील एकूण आठ हजार 970 शिक्षक-शिक्षकेतरांचे 13 मार्च 2018 च्या शासन निर्णयानुसार वैयक्तिक मान्यता दिलेल्या शिक्षकांचे व उच्च माध्यमिक शाळांमधील पुरवणी मागणीद्वारे मान्य केलेल्या शिक्षकांचे वेतन वितरित केल्यानंतर ऑफलाइन पद्धतीने अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

Web Title: Teacher's salary is now offline till March