येवल्यात करपणारी पिके पाहताना डोळ्यातील अश्रूही जाताय थिजून

संतोष विंचू
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

येवला - "अरे काळ्याभोर ढगा बरस की रे आज, जुलै गेला उलटून निदान बाळग थोडी लाज रे..‘ असे क्रोधाने म्हणण्याची वेळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. आकाशात होणारी ढगांची गर्दी.., दाटलेल्या ढगामुळे अधेमधे आलेले अंधारून.., आज चांगली हजेरी लागणार हे बांधले गेलेले अंदाज.., अन प्रत्यक्षात पावसाची हुलकावणी...असे चित्र दररोज अंगवळणी पडलेल्या बळीराजाचे डोळे आता पिके कशी जगणार याकडे लागले आहेत. पुढील आठवड्यात पाऊस न आल्यास उभ्या पिकांची राखरांगोळी होणार हे नक्की आहे.

येवला - "अरे काळ्याभोर ढगा बरस की रे आज, जुलै गेला उलटून निदान बाळग थोडी लाज रे..‘ असे क्रोधाने म्हणण्याची वेळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. आकाशात होणारी ढगांची गर्दी.., दाटलेल्या ढगामुळे अधेमधे आलेले अंधारून.., आज चांगली हजेरी लागणार हे बांधले गेलेले अंदाज.., अन प्रत्यक्षात पावसाची हुलकावणी...असे चित्र दररोज अंगवळणी पडलेल्या बळीराजाचे डोळे आता पिके कशी जगणार याकडे लागले आहेत. पुढील आठवड्यात पाऊस न आल्यास उभ्या पिकांची राखरांगोळी होणार हे नक्की आहे.

यावर्षी सुरुवातीलाच रिमझिम पाऊस पडला तरीही पुढे पडेल म्हणत शेतकऱ्यांनी पेरणीचा जुगार खेळला आहे. सुरुवातीला अधूनमधून रिमझिमत्या पावसाने दोन आठवड्यापासून जणू उगडीपच दिल्याने सुमारे ९५ टक्के पिके करपली असून आता मरणासन्न पिके पाहताना बळीराजाच्या डोळ्यातील अश्रूही थिजून जाऊ लागली आहे.या आठवड्यात पाऊस न पडल्यास पिकांची राखरांगोळी होऊन हंगाम पूर्णतः उध्वस्त होणार आहे.ज्यांना काही अंशी पाणी आहे असे शेतकरी तुषार व ठिंबक सिंचनाने पाणी देऊन पिकांना जागवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.इतरांना आता आशा सोडण्याची वेळ आली आहे.

पावसाळ्याचे दोन महिने संपले असून नक्षत्रा मागुन नक्षत्र कोरडेढाक् चालल्याने जलसाठे कोरडे असल्याने विहिरीना थेंबभरही पाणी उतरलेले नाहीत. सर्वाधिक क्षेत्रावर पेरलेल्या मकाला जास्त पाण्याची गरज असते मात्र पाण्याचा झटका बसल्याने हे पिक जळू लागले आहे.तर कपाशीची वाढ खुंटलेले झाडे शेवटच्या घटका मोजू लागली आहेत. मुग, भुईमुग, सोयाबीन तर केव्हाच उन्हाने पिवळे पडले आहेत. जून, जुलैपाठोपाठ आता ऑगस्टलाही पावसाची काहीच चिन्हे दिसत नाहीत. उलट वेगवान कोरड्या वाऱ्यांमुळे जमिनीतील ओल हटत चालली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

“पिकांची होत असलेली वाताहात पाहून रहाडी येथे पिकात नांगर फिरवण्याची तर रेंडाळे येथे हातच्या गेलेल्या पिकांत जनावरे सोडण्याची वेळ आली आहे. मका,कपाशीला मोठा झटका बसला आहे. अजून आठवड्यात पाऊस आला तर नुकसान आहेच पण पिकांना जीवदान मिळेल.”
हितेंद्र पगार,कृषी मंडळ अधिकारी,येवला

दुष्काळ खटकणारा....!
- खरिपाच्या सुमारे ८० ते ९० टक्के पेरण्या संकटात
- हंगाम उध्वस्तेच्या मार्गावर
- ३१ गावांसह १९ वाड्याना टॅंकरने पाणीपुरवठा
- पेरणीसह खते,मशागतीचा खर्च मातीत
- सुकलेल्या पिकांचे दिसू लागले सांगाडे
- गावोगावच्या आढवडे बाजारासह येवल्याची बाजारपेठ ठप्प
- दुष्काळी स्थितीमुळे गावोगावी चोरांची दहशत
- शेतमजूरांना भासतेय आर्थिक चणचण
- तालुक्यातील 3 तलावासह २०० वर छोठे-मोठे बंधारे कोरडेच 
- लाखावर नागरिकांना टंचाईच्या झळा  
- अनेक गावांत टॅंकरची मागणी होणार
- चारा पाणी टंचाईने पशुधन धोक्यात,चाऱ्याचा प्रश्न तीव्र
- वाडी वस्त्यांवर पिण्यासाठी विकतचे पाणी
- दुष्काळात वाढणार कर्जाचा डोंगर !
- कृत्रिम पावसाची मागणी
- सोयाबीन, मका, भुईमूग ही पिके हातातून गेली
- चारा छावण्या सुरू कराव्या लागणार
- दुष्काळी खरिपानंतर पाऊस न पडल्यास रब्बीही अडचणीत

Web Title: Tears are also seen in the eyes while watching the crops are destroyed