‘एचएएल’ला तेजसचे काम

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

नाशिक - काही दिवसांपासून ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स कारखान्याकडे (एचएएल) कोणत्याही प्रकारची कामे शिल्लक राहणार नसल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे. प्रत्यक्षात १२३ तेजस या लढाऊ विमानांचे तब्बल एक लाख कोटींचे काम या कारखान्याला देण्यात आले आहे. देशातील बंगळूरसह नाशिकलाच ही कामे होणार असल्याचा दावा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी केला.

अग्रवाल समाजाच्या राज्यव्यापी महिला अधिवेशनाच्या निमित्ताने आलेले डॉ. भामरे यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ‘एचएएल’ला काम नसल्याबद्दलची चुकीच्या माहितीवर कोणीही विश्‍वास ठेवू नये, असे सांगताना याबाबत येत्या १० ते १५ दिवसांत अधिकृत घोषणा करणार असल्याचे भामरे यांनी  सांगितले. ‘एचएएल’मध्ये आता काही काम राहिले नसल्याचे २०२० नंतर हा कारखाना बंद पडेल, असे चित्र रंगविले जात असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, तसेच वायुदल संदर्भातील तब्बल एक लाख कोटी रुपयांचे काम त्यांना दिल्याचे भामरे यांनी सांगितले. देशातील ‘एचएएल’चे प्रकल्प असलेल्या ठिकाणीच याबाबतचे कामे होणार असून, यात नाशिकचाही समावेश असल्याचा विश्‍वासही व्यक्त केला. 

धुळे महापालिकेत भाजप
संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे व आमदार अनिल गोटे यांच्यातील वादाच्या पार्श्‍वभूमीवर धुळे महापालिका निवडणुकीविषयी प्रश्‍न विचारला असता कोणी कितीही विरोध केला. धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

डिफेन्स हब नाशिकला
नाशिकच्या प्रस्तावित ‘डिफेन्स हब’च्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्‍नांवर ते म्हणाले, की कोणत्याही परिस्थितीत डिफेन्स इनोव्हेटिव्ह हब नाशिकमध्येच होणार आहे. संरक्षण आणि हवाई दल क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी कोईमतूरला ‘डिफेन्स हब’ आहे. त्यापाठोपाठ आता देशातील दुसरो  हब नाशिकमध्येच होणार असल्याचा दावा केला.

Web Title: Tejas work to HAL