जिल्ह्याचे तापमान 43 पर्यंत जाणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

कापडणे - जिल्ह्यात सूर्य जणू आग ओकू लागला असून आजचे तापमान 41.2 अंश सेल्सिअस एवढे होत. हा तडाखा असाच वाढत जाणार असून आगामी सहा दिवसात तापमान 42 ते 43 अंशापर्यंत जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राहुरी कृषी विद्यापीठाच्या हवामानावर आधारित कृषी सल्ल्याबाबत आज झालेल्या साप्ताहिक बैठकीत ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आगामी दोन दिवसात तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्‍यता आहे तसेच पुढील पाच दिवसात कमाल तापमान 41 ते 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 ते 19 अंश राहील. कमाल आर्द्रता 09 ते 31 टक्के तर किमान 3 ते 5 टक्के राहील.
Web Title: temperature 43 degree