तापमानवाढीचा भडका; जळगाव ४५ अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

जळगाव - कमाल तापमानात वाढ होत असल्याने उकाड्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ‘मे हीट’च्या तडाख्यात आग ओकणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दराप्रमाणेच तापमानाचाही भडका उडाला असून, जळगावचे तापमान आज थेट ४५ अंशांवर नोंदले गेले. सोबतच आर्द्रतेतही प्रचंड वाढ झाल्याने उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले. 

महिनाभरापासून उन्हाचा तडाखा जाणवत आहे. तापमान काही अंशांनी देखील खाली येण्याचे नाव घेत नाही. जळगाव शहराचे तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदविले जात असून आठवड्यापासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. यातच वाढलेला उकाडा आणि उष्णतेच्या झळांमुळे जळगावकर प्रचंड हैराण आहेत. या आठवड्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यात वाढ झाली. कमाल तापमान ४४.२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २९.२ अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ५६ टक्‍के होती.

उकाड्याने घामाच्या धारा
तापमानवाढीसोबतच आर्द्रताही वाढल्याने उकाडा देखील वाढला आहे. वाढलेल्या तापमानाच्या झळा असह्य होत आहेत. आर्द्रता वाढल्याने अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढ असून उकाडा असह्य होत आहे. बाहेर असह्य उष्णतेच्या झळा आणि घरात घामाच्या धारा अशी स्थिती जळगावकरांची झाली आहे. काम करताना किंवा नुसते बसलेले असताना देखील उष्णतेमुळे अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. 

अघोषित भारनियमनाचा त्रास
‘महावितरण’कडून भारनियमन सुरू करण्यात आले नसले, तरी शहरातील अघोषित भारनियमनाचा त्रास जळगावकरांना सहन करावा लागत आहे. दुरुस्तीच्या नावाने शहरात तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित राहत आहे. यामुळे दुपारी नागरिक उकाड्याने हैराण होत आहेत.

आकडे आपापले
४६ - वेलनेस वेदर
४५ - स्कायमेट 
४४ - आयएमडी 
४७ - राष्ट्रीय महामार्गावर

Web Title: temperature 45 degree