तापमानाचा उच्चांक कायम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

जळगावचा पारा ४४ अंशांवर; रस्ते झाले निर्मनुष्य
जळगाव - शहराच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज तापमानाचे उच्चांक गाठत ४४.४ अंशापर्यंत मजल गाठली आहे. आज रविवार सुटीचा दिवस असूनही दुपारी बारानंतर रस्ते निर्मनुष्य झाले होते. त्यामुळे शहरात जणूकाही अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र दिसून आले. 

असह्य होणाऱ्या तापमानाचे चटके सध्या चांगलेच जाणवू लागले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून सूर्य जणू आग ओकू लागला आहे. आजचे कमाल तापमान ४४.४, किमान २७ अंश सेल्सिअस तर आर्द्रता ५२ टक्के नोंदविली असल्याची माहिती ममुराबाद वेध शाळेने दिली आहे. वाढत्या तापमानामुळे जळगावकरांना घराबाहेर पडणे कठीण बनले आहे. जिल्ह्यात एप्रिलच्या सुरवातीला चाळीशीवर पोचलेला पारा मध्यंतरी खाली आला होता. परंतु, मागील पाच-सहा दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. तापमानाची तीव्रता वाढल्याने सकाळी दहानंतर अंगाला चटके जाणवू लागत आहेत. यामुळे सकाळी दहानंतर घराबाहेर निघण्यासही कोणी तयार नाही. यामुळे दिवसभर शहरातील मुख्य रस्तेही ओस पडलेले पाहावयास मिळतात. सायंकाळी पाचनंतर रात्री उशिरापर्यंत उष्णतेच्या झळा जाणवत आहेत.

शहराचे तापमान 
तारीख    कमाल तापमान 

२५ एप्रिल    ४३.० 
२६ एप्रिल    ४२.६
२७ एप्रिल    ४३.०
२८ एप्रिल    ४५.०
२९ एप्रिल    ४४.४

Web Title: temperature increase summer