थंडगार नाशिकला उन्हाचा चटका 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

नाशिक : थंड शहर अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये ऑक्टोबर हिटची चाहूल लागायला सुरवात झाली आहे.  गुरुवारी (ता.१९) शहरात पाऊस झाल्यानंतर शुक्रवारी अचानक वातावरणात बदल होऊन वातावरण तापायला सुरुवात झाले आणि रविवारी (ता.२२) पारा थेट ३१.२ अंशांपर्यंत पोहचला. यामुळे उन्हाची अधिकच तीव्रता जाणवली. 

नाशिक : थंड शहर अशी ओळख असलेल्या नाशिक शहरात गेल्या काही चार दिवसांत अचानक तापमानात वाढ होताना दिसली. रविवारी उन्हाची अधिकच तीव्रता जाणवली.  गुरुवारी (ता.१९) शहरात पाऊस झाला तेव्हा कमाल तापमान ३०.१ अंश इतके नोंदविले गेले. मात्र शुक्रवारी अचानक वातावरणात बदल रविवारी पारा  ३१.२ अंशांपर्यंत पोहचला. त्यामुळे नागरिकांना रविवारी उन्हाची अधिकच तीव्रता जाणवली.

नागरिकांनो..आरोग्य सांभाळा

वातावरणात उष्मा वाढल्याने रविवारी नागरिकांना दिवसभर त्याचा त्रास सहन करावा लागला. अचानक वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उन्हापासून संरक्षण करण्याचा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे. 

पुढील काही दिवस होईल तापमानात
यंदा ऑक्टोबर हिटची सुरवात लवकर दिसायला लागली असून रविवारी (ता.२२) पारा ३१ अंशापर्यंत पोहचला. यामुळे वातावरणात कमालीचा उष्मा निर्माण झाला. हा पारा पुढील दोन ते तीन दिवस आणखी वाढण्याची शक्यता आहे. यानंतर वीजांच्या गडगडटांसह पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. - किरणकुमार जोहरे, भौतिकशास्त्रज्ञ व हवामान अभ्यासक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: temperature increasing in nashik