मालेगावचे तापमान पुन्हा ४४.८ अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

मालेगाव - शहरातील उन्हाचा ज्वर पुन्हा वाढला आहे. तीन दिवसांपासून ४१ ते ४३ अंशांदरम्यान असलेले तापमान रविवारी (ता. २०) थेट ४४.८ अंशांवर पोचले. शहराचे तापमान शुक्रवारी (ता. १८) ४१.२ अंश, तर शनिवारी (ता. १९) ४२.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. मात्र, रविवारी तापमानाने अचानक उसळ खाल्ली. यंदाच्या हंगामातील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान आहे. यापूर्वी २७ एप्रिलला ४४.८ एवढे तापमान नोंदले गेले होते. दरम्यान, रविवारी (ता. २०) नाशिकमध्येही कमाल व किमान तापमानात वाढ नोंदली गेली. कमाल तापमान ३९.३, तर किमान तापमान २२.७ अंश सेल्सिअस होते.

मालेगाव - शहरातील उन्हाचा ज्वर पुन्हा वाढला आहे. तीन दिवसांपासून ४१ ते ४३ अंशांदरम्यान असलेले तापमान रविवारी (ता. २०) थेट ४४.८ अंशांवर पोचले. शहराचे तापमान शुक्रवारी (ता. १८) ४१.२ अंश, तर शनिवारी (ता. १९) ४२.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. मात्र, रविवारी तापमानाने अचानक उसळ खाल्ली. यंदाच्या हंगामातील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान आहे. यापूर्वी २७ एप्रिलला ४४.८ एवढे तापमान नोंदले गेले होते. दरम्यान, रविवारी (ता. २०) नाशिकमध्येही कमाल व किमान तापमानात वाढ नोंदली गेली. कमाल तापमान ३९.३, तर किमान तापमान २२.७ अंश सेल्सिअस होते. किमान तापमानातही वाढ झाल्याने दिवसभर व सायंकाळनंतरही असह्य उकाडा जाणवत होता.

Web Title: The temperature of Malegaon at 44.8 degrees