Vidha Sabha 2019 : जळगाव जिल्ह्यात दहाच महिलांना उमेदवारीची संधी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. अकरा विधानसभा मतदार संघात अकरा जागांसाठी एकूण 100 उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील पाच मतदारसंघातच दहा महिलांना उमेदवारीची संधी दिली आहे.

विधानसभा 2019 
जळगाव - जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. अकरा विधानसभा मतदार संघात अकरा जागांसाठी एकूण 100 उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील पाच मतदारसंघातच दहा महिलांना उमेदवारीची संधी दिली आहे. इतर सात ठिकाणी एकही महिला उमेदवार नसल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात अकरापैकी सर्वांत जास्त उमेदवार 11 "बसपा'ने दिले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने 9 ठिकाणी, भाजपने 7, शिवसेनेने 4, कॉंग्रेसने 1, मनसे-6 इतर अपक्षांनी 62 उमेदवार दिले आहेत. 

उमेदवारी दाखल करण्याच्या दिवसांपर्यंत एकूण 279 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी 55 अर्ज अवैध ठरले. 54 जणांनी माघार घेतली. आता रिंगणात शंभर उमेदवार आहेत. यात 90 पुरुष तर 10 महिला आहेत. 

मतदारसंघनिहाय रिंगणातील उमेदवार असे 
चोपडा--8 
रावेर--10 
भुसावळ--12 
जळगाव शहर--13 
जळगाव ग्रामीण--11 
अमळनेर--7 
एरंडोल--8 
चाळीसगाव--8 
पाचोरा--7 
जामनेर--9 
मुक्ताईनगर--7 
एकूण--100 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten women get candidacy in Jalgaon district