नवापूर-शिर्डी-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाची निवीदा रद्द

अंबादास देवरे  
गुरुवार, 14 जून 2018

सटाणा : नाशिक, नगर, धुळे व औरंगाबाद या चार जिल्ह्यांना जोडणाऱ्या नवापूर - शिर्डी - औरांगाबाद या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या २३२.४२ किलोमीटर लांबीच्या रस्ते कामासाठी १५०५.३२ कोटी रुपये अंदाजे खर्चाच्या निविदा केंद्र शासनाने सहा महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केल्या होत्या. इच्छुकांनी ऑनलाईन निविदा भरल्यानंतर आता अचानक त्या निविदा रद्द केल्याने महामार्गाचे काम पुन्हा रखडले आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून लालफितीत अडकलेल्या या राज्य महामार्गास केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देत प्रत्यक्ष कामास लवकरच सुरुवात होण्याचे सुतोवाच केले.

सटाणा : नाशिक, नगर, धुळे व औरंगाबाद या चार जिल्ह्यांना जोडणाऱ्या नवापूर - शिर्डी - औरांगाबाद या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या २३२.४२ किलोमीटर लांबीच्या रस्ते कामासाठी १५०५.३२ कोटी रुपये अंदाजे खर्चाच्या निविदा केंद्र शासनाने सहा महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केल्या होत्या. इच्छुकांनी ऑनलाईन निविदा भरल्यानंतर आता अचानक त्या निविदा रद्द केल्याने महामार्गाचे काम पुन्हा रखडले आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून लालफितीत अडकलेल्या या राज्य महामार्गास केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देत प्रत्यक्ष कामास लवकरच सुरुवात होण्याचे सुतोवाच केले. त्यामुळे व्यापार - उदीम, उद्योग, दळणवळण व पर्यटनास चालना मिळेल, या अपेक्षेत असलेल्या चारही जिल्ह्यातील जनतेचा निविदा रद्द झाल्याने अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे चारही जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे. राज्य शासनासह लोकप्रतिनीधींनी केंद्र शासनावर दबाव टाकून विकासाच्या दृष्टीने या महामार्गाचे काम सुरु करण्याची गरज आहे.

केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय व महाराष्ट्र राज्य परिवहन विकास महामंडळातर्फे ता.८ डिसेंबर २०१८ रोजी या रस्ता व महामार्ग विकासासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार संबंधित ठेकेदारांनी अंदाजित रक्कमेनुसार आपल्या निविदा ऑनलाईन पद्धतीने भरल्या होत्या. मात्र निविदांवर अंतिम निर्णय न घेता केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ता.२१ एप्रिल २०१८ रोजी त्यांच्या संकेतस्थळावर नाशिक, नगर, धुळे व औरंगाबाद या चार जिल्ह्यातील निवडक महामार्गाच्या निविदा कोणतेही कारण न देता रद्दबातल करत असल्याचे जाहीर केले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी या महामार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र निविदाच रद्द ठरल्याने राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न एक मृगजळ ठरले आहे. 

केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर या राष्ट्रीय महामार्गाच्या खालील निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.  
Package No. 9/Nsk/2017 NH-752G साक्री ते पिंपळनेर या २१.४३ किलोमीटर अंतरासाठी १००.३७ कोटी रुपये 
Package No. 10/Nsk/2017 NH-752G पिंपळनेर ते सटाणा या ४२.५७ किलोमीटर अंतरासाठी १८६.२३ कोटी रुपये
Package No. 11/Nsk/2017 NH-752G सटाणा - देवळा - मंगरूळ या ३७.१४ किलोमीटर अंतरासाठी १७४.४९ कोटी रुपये
Package No. 12/Nsk/2017 NH-752G चांदवड ते मनमाड या २४.०५ किलोमीटर अंतरासाठी १२१.२८ कोटी रुपये
Package No. 13/Nsk/2017 NH-752G विसरवाडी ते कळंबा या २५ किलोमीटर अंतरासाठी १३९.१९ कोटी रुपये
Package No. 14/Nsk/2017 NH-752G कळंबा ते कोलदे या २५.२० किलोमीटर अंतरासाठी १५८.८० कोटी रुपये
Package No. 19/Nsk/2017 NH-63 रेणापूर ते अष्टमोडे या २४.०३ किलोमीटर अंतरासाठी १९७.६१ कोटी रुपये
Package No. 21/Nsk/2017 NH-63 तिव्याट्याळ ते रावी या ३३ किलोमीटर अंतरासाठी २०५.१९ कोटी रुपये

Web Title: tender cancelled of navapur shirdi aurangabad national high way