'कोडेड टेक्‍स्ट बुक्‍स'चा प्रयोग थायलंड व मलेशियातील शाळेत! 

मंगेश गोमासे
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

नागपूर : बालभारतीच्या पुस्तकांमध्ये 'क्‍यूआर कोड'चा वापर विद्यार्थ्यांना सहजरीत्या मोबाईलवर वाचण्यासाठी देण्याचे काम करण्यात आले. सोलापूरचे तंत्रस्नेही शिक्षक रणजित डिसले यांनी तयार केलेल्या 'क्‍यूआर कोड'ला आता परदेशातही मागणी आहे.

त्यांच्या 'कोडेड टेक्‍स्ट बुक'चा प्रयोग थायलंड आणि मलेशिया शाळांनाही हवा आहे. तेथील मुख्याध्यापकांनी या 'बुक्‍स' वापरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

नागपूर : बालभारतीच्या पुस्तकांमध्ये 'क्‍यूआर कोड'चा वापर विद्यार्थ्यांना सहजरीत्या मोबाईलवर वाचण्यासाठी देण्याचे काम करण्यात आले. सोलापूरचे तंत्रस्नेही शिक्षक रणजित डिसले यांनी तयार केलेल्या 'क्‍यूआर कोड'ला आता परदेशातही मागणी आहे.

त्यांच्या 'कोडेड टेक्‍स्ट बुक'चा प्रयोग थायलंड आणि मलेशिया शाळांनाही हवा आहे. तेथील मुख्याध्यापकांनी या 'बुक्‍स' वापरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

राज्यातील शाळांची गुणवत्ता वाढावी, तसेच ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बालभारतीला 'क्‍यूआर कोड'चा वापर करून त्याद्वारे कविता, पाठ, स्वाध्याय आदी 'ऍप'मधून विद्यार्थ्यांना ते सहजरीत्या उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर रणजित डिसले यांनी 'व्हर्च्युअल फील्ड ट्रिप' उपक्रमाद्वारे भारतासह विदेशातील विविध तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी 'स्काय-पी'च्या माध्यमातून विविध देशांतील भौगोलिक आणि वैविध्यपूर्ण गोष्टींचा अभ्यास स्वत:च्या शाळेतील विद्यार्थ्यांना करून दिली.

यासाठी त्यांनी 'मायक्रोसॉफ्ट' कंपनीची मदत घेतली. त्यातून डिसले यांची शाळा जवळपास पाच हजार दोनशे शाळांसोबत 'मायक्रोसॉफ्ट'च्या माध्यमातून जोडल्या गेली. याद्वारे त्यांनी आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन, समुद्रातील तेलवाहू जहाजातून होणाऱ्या तेल गळतीमुळे प्रभावित होणारे पेंग्विन पक्षी व त्यांचे संवर्धन हा या आभासी सफरीचा आनंद घेतला.

याशिवाय थेट तज्ज्ञ शिक्षकांशीही संवाद साधला. या संवादातून रणजित डिसले यांनी त्यांच्या 'कोडेड टेक्‍स्ट बुक्‍स'चा प्रयोग थायलंड व मलेशियामधील मुलांना दाखवण्यात आला. थायलंड आणि मलेशियातील शाळांना या 'बुक्‍स' आवडल्या असून त्यांनी त्या वापरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. येत्या 29 नोव्हेंबरला थायलंडमधील सेंट महाराज स्कूल येथील मुलांशी या उपक्रमाबाबत संवाद साधण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा उपक्रम आता आंतरराष्ट्रीय पातळीवर राबविल्या जात आहे. या प्रयोगातून केवळ तंत्रज्ञानाचीच नव्हे, तर भारतीय संस्कृती व शिक्षण याबाबत विचारांची देवाण-घेवाण या दिवशी होणार आहे. 

 

.......कोट........ 
बालभारती ते आंतरराष्ट्रीय शाळेपर्यंतचा हा प्रवास अतिशय सुखद असून यापूर्वी बालभारतीने 'क्‍यूआर कोड'चा वापर करून त्याला सर्व मान्यता दिली. शाळा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठीच हे प्रयोग असून त्यामागचा उद्देश सफल झाल्याचा आनंद आहे. 
- रणजित डिसले, तंत्रस्नेही शिक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thailand and Malaysia to follow Solapur pattern of Coded text books, reports Mangesh Gomase