जैन मंदिरात साडेआठ लाखांची चोरी

तुषार देवरे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

देऊर : नेर (ता.धुळे) येथे काल रात्री गावातील मध्यभागी असलेले श्री. जैन श्वेतांबर मूर्तिपूजन संघ 

जैन मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत सोन्या चांदीचे दागिने, मूर्तीचे मुकूट, सह तीन लाख रोकड असा साडेआठ लाखांवर ऐवज चोरून नेला. दरम्यान आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास  'डॉग स्कॉड' (श्वान पथक) पाचारण करण्यात आले होते.

देऊर : नेर (ता.धुळे) येथे काल रात्री गावातील मध्यभागी असलेले श्री. जैन श्वेतांबर मूर्तिपूजन संघ 

जैन मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत सोन्या चांदीचे दागिने, मूर्तीचे मुकूट, सह तीन लाख रोकड असा साडेआठ लाखांवर ऐवज चोरून नेला. दरम्यान आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास  'डॉग स्कॉड' (श्वान पथक) पाचारण करण्यात आले होते.

साडेदहा वाजेच्या सुमारास पोलिस अधीक्षक विश्वासराव पांढरे, उपविभागीय पोलिस अधिकारी घुमरे, धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, धुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक भाबड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ए.के.वळवी, हवालदार पी.एन. चव्हाण आदि पोलिस कर्मचाऱ्यांनी जैन मंदिरात झालेल्या चोरीची पाहणी केली. चौकशीसाठी मंदिरातील आजूबाजूच्या सर्व घटनेचा तपशील पोलिस पथकाने घेतला.

पाचारण करण्यात आलेले 'डॉग स्कॉड' गावातील बाजारपेठेच्या पुढील प्राथमिक आरोग्य केंद्रापुढील चेंदळ रस्त्यापर्यंत माग काढला. मात्र चोरट्यांचा तेथून तपास लागला नाही. आज सकाळी मंदिरात पुजारी प्रफुल्ल जैन, मॅनेजर किर्ती जैन पूजा करण्यासाठी गेले असता तेव्हा मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. कपाट तोडलेले, सात ठिकाणी कुलूप तोडलेले आढळले. ग्रामपंचायत सदस्य सिद्धांत जैन व पूजारींनी ग्रामस्थ, पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर जैन मंदिराकडे ग्रामस्थांची एकच गर्दी झाली. आज दुपारी घटनेची दुपारी धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

पोलिस अधिक्षक पांढरे म्हणाले, घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर कुणीही व्हायरल करू नये. नियम पाळा. यामुळे चोरीचा तपास लागत नाही.

पोलिस अधिक्षक पांढरे यांच्याकडे  सरपंच शंकरराव खलाणे यांनी नेर ला पोलिस ठाण्याची मागणी व महामार्गावर पोलिसांची गरज याबाबत माहिती दिली. चोरट्यांनी मंदिरातील कपाटे, दानपेटी फोडून अस्ताव्यस्त फेकलेले होते. तालुक्याला नोंद आठ लाख पस्तीस हजार रूपयांची केली असली तरी, पंधरा लाखापर्यंत ऐवज चोरट्यांनी नेल्याची चर्चा गावात आज सुरू होती. नेर पोलिस कर्मचार्यांसाठी चोरीची घटना  एक आव्हान ठरली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरिक्षक दिवाणसिंग वसावे करीत आहे. या घटनेने नेर परिसरात ग्रामस्थांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

नेर येथे पोलीस दूरक्षेत्र असून सुध्दा एवढ्या मोठ्या धाडसी चोऱ्या होतात. चोरांची किती मुजोरी वाढली आहे. हे या घटनेवरून दिसते. या पार्श्वभूमीवर नेर येथे महामार्गावर कॅनव्हॉय पाइंट लावावा. तसेच रात्रीची गस्त व पेट्रोलिंग व्हॅन रात्री परीसरात फिरवावी. वरिष्ठ अधिकार्यांनी येथील पोलिस दूरक्षेत्राचे रुपांतर पोलिस ठाण्यात करावे. यामुळे कामकाजात गती मिळेल.
शंकरराव खलाणे - सरपंच नेर (ता.धुळे)

Web Title: Theft of 8.5 lakhs of jewelery in jain temple