गोदाम फोडत चोरट्यांची पोलिसांना "सलामी'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

जळगाव - गेल्या साधारण महिनाभरापासून बंद असलेल्या चोऱ्या-घरफोड्यांच्या घटना "ब्रेक के बाद' पुन्हा सुरू झाल्या आहेत.

प्रजासत्ताकदिनाचा उत्साह रात्रीपर्यंत ओसरल्यानंतर चोऱ्यांनी डाव साधत नव्या बसस्थानकामागील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कांताई सभागृहाजवळचे चोपडा मार्केटमधील गोदाम फोडत दोन लाखांच्या रोकडसह 47 लाखांच्या मालावर डल्ला मारला आणि प्रजासत्ताकदिनी पोलिसांना "सलामी' दिली.

जळगाव - गेल्या साधारण महिनाभरापासून बंद असलेल्या चोऱ्या-घरफोड्यांच्या घटना "ब्रेक के बाद' पुन्हा सुरू झाल्या आहेत.

प्रजासत्ताकदिनाचा उत्साह रात्रीपर्यंत ओसरल्यानंतर चोऱ्यांनी डाव साधत नव्या बसस्थानकामागील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कांताई सभागृहाजवळचे चोपडा मार्केटमधील गोदाम फोडत दोन लाखांच्या रोकडसह 47 लाखांच्या मालावर डल्ला मारला आणि प्रजासत्ताकदिनी पोलिसांना "सलामी' दिली.

गोदामातील माल चोरण्यासाठी चोरटे गाडी घेऊनच आले होते व शिताफीने त्यांनी गोदाम फोडत थेट अर्ध्या कोटीचा माल लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर "सीसीटीव्ही' कॅमेऱ्यात कैद चोरट्यांच्या तपासार्थ पोलिसांची पथके विविध ठिकाणी मार्गस्थ झाली आहेत.

नियोजनबद्धपणे चोरी
घटनास्थळाजवळ 12 वाजता दोन जण आले त्यांनी भजे गल्ली परिसर टेहळणी केली. त्यानंतर पुन्हा दुकानाजवळ तीन जण एकत्र आले. त्यापैकी दोन जणांनी शटरचे कुलूप तोडले यानंतर तिघांपैकी एक जण आतमध्ये जाऊन आतील लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून मालाची खात्री केली. तो पुन्हा बाहेर येऊन काही वेळाने बोलेरो गाडीत तीन जणांनी सिगारेटच्या खोक्‍यांचा माल भरून झाल्यानंतर 27 मिनिटांनंतर ही गाडी रवाना झाली. काही सेकंदातच दुसरी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार येऊन उर्वरित माल भरला व यानंतर 2 वाजून 40 मिनिटांनी गाडीसह चोरटे रवाना झाले.

"सीसीटीव्ही'त कैद झाले चोरटे
सुरेश पाटील यांचे कार्यालय व गोदाम तसेच बाजूचे संतोष मेडिकल याठिकाणी एकूण 11 "सीसीटीव्ही' कॅमेरे बसविले आहेत. गोदाम व कार्यालय असे एकूण चार व बाहेर एक अशा पाच कॅमेऱ्यांमध्ये चोरटे कैद झाले आहेत. शटर उघडताना, माल वाहून नेताना, गाडीत माल भरताना असे एकूण चार जण दिसून येत आहेत. एक जण दुकानातून शटरपर्यंत माल नेत असून इतर तिघे गाडीत माल भरताना दिसून येत आहे.

गाडी येताच चोरटे घाबरले
गोदामातून चोरीचा करत असताना अचानक 2 वाजून 23 मिनिटांनी कांताई सभागृहाकडून एक पांढऱ्या रंगाची सुमो गाडी भजे गल्लीकडे गेली. गाडीच्या लाईटमुळे चोरटे घाबरून ते मालवाहू गाडीत जाऊन लपले. काही मिनिटांनी चोरटे गाडीतून बाहेर येऊन पुन्हा माल गाडीत भरण्यास सुरवात केल्याचे "सीसीटीव्ही'त कैद झाले आहे

जास्त माल नेण्यासाठी खोके फाडले
चोरी करताना स्विफ्ट कारमध्ये माल भरत असताना त्यात माल बसत नव्हता. त्यामुळे जास्तीत जास्त माल नेता यावा यासाठी चोरट्यांनी शक्कल लढवून खोके फाडले व त्यातील सिगारेटचे पाकीट गाडीत भरले. असे सात रिकामे खोके घटनास्थळी फेकल्याचे फुटेजमध्ये दिसून येत असून, सकाळी कचरा वेचणारे रिकामे खोके घेऊन गेले असावेत असा अंदाज आहे.

Web Title: theft in godown