भावाच्या घरात झाडू मारून चोरटा समोरून निघून गेला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

रिंगरोडवर भरदिवसा घरफोडी; ४१ हजारांचा ऐवज लंपास; सीसीटीव्ही फुटेज करणार संकलीत

जळगाव - रिंगरोडवर जिल्हा बॅंक समोरील गीताई बिल्डिंग मधील रहिवासी नरेंद्र जगन्नाथ दहाड यांच्या घरात घरफोडी केल्यावर संशयित चोरटा लहान भावाच्या दुकानासमोरुन सहज निघून गेल्याची घटना आज दुपारी एकला घडली. जिल्हापेठ पोलिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्यात ४१ हजारांचा ऐवज चोरीला गेला असून तक्रारदार मनोज दहाड यांनी चोरट्याचे वर्णनही पोलिसांना सांगितले आहे. 

जिल्हा बॅंकेसमोर गीताई बिल्डिंगमध्ये मनोज व नरेंद्र दहाड हे दोन्ही भाऊ स्वतंत्र वास्तव्यास आहेत. नरेंद्र यांचा खासगी व्यवसाय आहे तर मनोज यांचे याच इमारतीत तळमजल्यात मेडिकल आहे. भाऊ नरेंद्र, वहिनी सुवर्णा दहाड व त्यांचे दोन्ही मुले १२ मे पासून कुलुमनाली येथे पर्यटनासाठी गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. दुपारी एकला मेडिकल बंद करून मनोज हे घरी दुसऱ्या मजल्यावर जेवायला जात असताना नरेंद्र दहाड यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा व कुलूप तुटलेले आढळून आले.

तर दरवाजाही उघडा होता. संशय आल्याने मनोज यांनी घरात डोकावून पाहिले असता कपाट व लॉकर्स उघडे होते, तर सामान अस्ताव्यस्त पडलेला आढळून आले. चोरी झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी भाऊ नरेंद्र आणि जिल्हापेठ पोलिसांना घटना कळविली. 

चाळीस हजारावर ऐवज लंपास 
मनोज यांनी भाऊ नरेंद्र यांना फोन करून घरातील साहित्य अथवा दागिने काय होते याची विचारणा केली. त्यानुसार दहा हजार रुपये किमतीचे तीस भार चांदीचे ३० शिक्के, दहा हजार रुपये किमतीचे १५ भारचे चांदीचे दोन कडे, १ हजार रुपये किमतीचे दोन पैंजण व २० हजार रुपये किमतीचे तीन तोळ्याचे ३ शिक्के असा मुद्देमाल चोरी गेला आहे. याप्रकरणी मनोज दहाड यांच्या तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरटा डोळ्यांदेखत गेला

मनोज दहाड आपल्या सुमीत मेडीकलवर बसले असताना, बोळीतून एक अज्ञात तिशीतील तरुण निघाला व मेडीकलसमोरुन जात असताना त्याला हटकले असता त्याने काहीएक न बोलता निघून गेला. त्यानेच नरेंद्र दहाड यांचे घरफोडले असावे असा संशय आहे. त्या दृष्टीने पोलिस सीसीटीव्ही फुटेज संकलित करीत आहे.

Web Title: theft in jalgav