दहा वर्षापूर्वी बांधलेले विश्रामग्रह अजूनही उद्घटनाच्या प्रतीक्षेतच

संतोष घोडेराव
मंगळवार, 15 मे 2018

अंदरसुल : येवला तालुक्यातील अंदरसूल येथे दहा वर्षापूर्वी दहा लाख रुपये खर्च करून बांधलेल्या देखण्या शासकीय विश्राम गृहाला उद्घाटनापूर्वीच उतरत्या कळा लागल्या आहेत. वाटसरू देखील या गृहाचा सर्रासपणे मुतारी म्हणून वापर करीत असून कित्येक टवाळखोरांचे ते रात्रीचे आश्रयस्थान बनले आहे.

अंदरसुल : येवला तालुक्यातील अंदरसूल येथे दहा वर्षापूर्वी दहा लाख रुपये खर्च करून बांधलेल्या देखण्या शासकीय विश्राम गृहाला उद्घाटनापूर्वीच उतरत्या कळा लागल्या आहेत. वाटसरू देखील या गृहाचा सर्रासपणे मुतारी म्हणून वापर करीत असून कित्येक टवाळखोरांचे ते रात्रीचे आश्रयस्थान बनले आहे.

येवला तालुक्यातील वीस हजार लोकसंख्या असलेल्या अंदरसुल गावात बाहेरून येणाऱ्या अधिकारी व पदधिकारिसह इतरांची राहण्याची सोय व्हावी या हेतुने नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत सन् 2008/09 ला म्हणजेच दहा वर्षा पूर्वी तब्बल दहा लाख रुपये खर्च करून येथे शासकीय विश्रामगृह बांधण्यात आले आहे. परंतु अजुन ही या विश्रामगृहाच्या उद्घटनाला शासनाकडे मुहूर्त सापडलेला नाही. परिणामी शोभेचे वस्तु बनलेल्या या विश्रामगृहाची संपूर्ण वाताहत झाली आहे. विश्राम गृहाचे दरवाजे व खिडक्यांच्या काचा तुटल्या असून सर्व ख़ोल्यातील भिंतीवर सर्वत्र जाळ्यांचे साम्राज्य पसरले आहे.मागील बाजूच्या बांधलेल्या तट संरक्षण भिंती ही पडून गेल्या आहेत. परिणामी अंदरसुलच्या या शासकीय विश्रामगृह उद्घाटनापूर्वी निर्लेखेखित का? असा ही प्रश्न आता अंदरसूलकरांना पडू लागला आहे.

दहा वर्षाचा कालावधी उलटून ही या विश्रामग्रहाचे उद्घाटन का होत नाही अशी शंका अंदरसुलकरांना वाटू लागली आहे. विशेष म्हणजे बांधण्यात आलेल्या या विश्रामगृहाची नोंद शासन दरबारी झालेली आहे की नाही, अन नोंद असेल तर उद्घटनाला इतका उशीर का असे एक ना अनेक सवाल प्रत्येकांच्या मनात घर करून बसले आहेत.

सदर विश्रामगृहाबाबत संबंधित अधिकारी न्यारखेडे यांना विचारले असता हा विषय माहिती नाही असे सांगून वर हात केले.मात्र यापूर्वी गावांतर्गत दहा वर्षाच्या काळात विश्राम ग्रहाच्या तुलनेत बचतगट वस्तु विक्री भवन,नागेश्वर मंदिर,बिरोबा मंदिर,एकलव्य नगरमधील सभागृह या सारख्या छोट्या मोठ्या विकास कामाचे उद्घाटन मोठ्या थाटात झाले आहेत. मात्र अजुन ही दहा लाख रुपये खर्च करून बांधलेल्या शासकीय विश्राम ग्रहाकड़े कानाडोळा  केल्याने उदघाट्न होतांना राहिले आहे.परिणामी रस्त्याने जाणार वाटसरू या ग्रहाची मुतारी म्हणून वापर करू लागला आहे तर टवाळखोरांचे ते एक आश्रयस्थान बनले आहे.

"दहा वर्षा पूर्वी लाखो रुपये खर्च करून शासनाने बांधलेल्या विश्राम ग्रहाचे उदघाटन करून बाहेरून आलेल्यांची राहण्याची सोय होईल.त्यामुळे इमारतीचा ही परिसर स्वच्छ राहील व जिल्हा परिषदेला ही उत्पन्न मिळेल."
- नम्रता जगताप, पंचायत समिती सदस्या

Web Title: their is no inauguration of rest house from last 10 years in andarsul