...तर मंत्र्यांना कांदे फेकून मारा : राज ठाकरे

रविंद्र पगार
बुधवार, 19 डिसेंबर 2018

कळवण : जर कांद्याला भाव मिळत नसेल तर भाजपच्या मंत्र्यांना कांदे फेकून मारा. त्यात ते बेशुद्ध पडले तर मारलेलेच कांदे उचलून त्यांच्या नाकाला सुंघवा असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. येथील शेतकरी प्रतिनिधींनी कांद्याच्या कवडीमोल भावाची कैफियत राज ठाकरे यांच्याकडे मांडली असता त्यांनी अशा शब्दांत सत्ताधारी पक्ष व सरकारवर टीका केली.

राज ठाकरे आज बुधवार (ता.१९) रोजी कळवण दौऱ्यावर कार्यकर्त्यांशी संवाद व विविध क्षेत्रातील मान्यवरांशी हितगूज साधण्यासाठी आले असता या प्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलतात याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी शेतकरी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्याशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी कांद्याच्या घसरलेल्या भावाबाबत नाराजी व्यक्त केली असता राज ठाकरे यांनी त्यांना सत्ताधाऱ्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेण्याचे आवाहन केले. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, उद्योगपती बेबीलाल संचेती, डॉ.प्रदीप पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Web Title: then through onions on Ministers says MNS Chief Raj Thackeray