आपल्या विरोधात गुन्हे नाहीत : दशपुत्रे 

WhatsApp-Image-2018-07-22-a.jpg
WhatsApp-Image-2018-07-22-a.jpg

नाशिक : ''त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्टवर नूतन विश्‍वस्तांची नियुक्ती करण्यात आली परंतु, यात पुजारी वर्गाकडील विश्‍वस्तपद रिक्त आहे. यासंदर्भात, आपल्यावर कोणत्याही गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप नाहीत, '' असे मिलिंद दशपुत्रे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले आहे. पुजारी वर्गासाठीचे विश्‍वस्त पद आरोपांमुळे रिक्त ठेवण्यात आले असून त्यासंदर्भात चौकशी सुरू आहे. 

त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या नूतन विश्‍वस्त पदासाठीची प्रक्रिया गेल्या महिन्यात सुरू झाली होती. त्यासाठी 113 सदस्यांनी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाकडे अर्ज सादर केले असता. सदस्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार, गेल्या 4 जुलैला नवीन विश्‍वस्तांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी, पुजारी वर्गांसाठीचे असलेले विश्‍वस्तपद रिक्त ठेवण्यात आले. या वर्गातील विश्‍वस्त पदासाठी मिलिंद दशपुत्रे आणि सत्यप्रिय शुक्‍ल यांनी अर्ज केला होता. यासंदर्भातील वृत्त 'सकाळ'मधून प्रसिद्‌ध झाले असता. त्यात मिलिंद दशपुत्रे यांच्यावर गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे म्हटले होते.

प्रत्यक्षात त्यांच्यावर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे किंवा आरोप नसल्याचे आणि कोणावरही तसे आरोप केलेले नाहीत असे श्री. दशपुत्रे यांनी सांगितले. दरम्यान, धर्मादाय सहआयुक्‍तांकडून यासंदर्भात स्वतंत्र चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर पुजारी वर्गासाठीचे असलेले विश्‍वस्त पदी नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे. 
 
आपल्यावर कोणत्याही गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे नाहीत वा आरोपही नाहीत. त्याचप्रमाणे आपण कोणावरही तसे आरोप केलेले नाहीत. 
- मिलिंद दशपुत्रे, त्र्यंबकेश्‍वर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com