खरेदीदारच नाही..आठवडे बाजार सुनासुना 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

नाशिकच्या गंगाघाटावर दर बुधवारी पारंपारिक आठवडे बाजार भरतो. पूर्वी मर्यादित असलेला या बाजारात आता अन्य विक्रेत्यांबरोबरच परिसरातील शेतकरी बांधवही आपला माल विक्रीसाठी आणू लागल्याने थेट गणेशवाडीच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पोहोचला आहेसायंकाळी पाचनंतरतर खरेदीसाठी मोठी गर्दी उसळते. मात्र दिवाळीच्या सुट्या सुरू असल्याने अनेकांची पसंती पर्यटनाला राहिली आहे तर काहींची पसंती नॉनव्हेजला असल्याने आठवडे बाजारात भाज्यांना भाव नसल्याचे चित्र आहे.

नाशिक : दिवाळीनंतर आलेल्या पहिल्याच बुधवारी (ता.३०) गंगाघाटावरील आठवडे बाजारात खरेदीदारच नसल्याने बाजार सुनासुनाच राहिला. विशेष म्हणजे मागणी नसल्याने पालेभाज्यांसह अन्य भाज्यांचे दरही सर्वसामान्यांच्या आटोक्‍यात राहिले. 
गंगाघाटावर दर बुधवारी पारंपारिक आठवडे बाजार भरतो. पूर्वी मर्यादित असलेला या बाजारात आता अन्य विक्रेत्यांबरोबरच परिसरातील शेतकरी बांधवही आपला माल विक्रीसाठी आणू लागल्याने थेट गणेशवाडीच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पोहोचला आहे

भाजीपाल्याचे दर आटोक्‍यात

सायंकाळी पाचनंतरतर खरेदीसाठी मोठी गर्दी उसळते. मात्र दिवाळीच्या सुट्या सुरू असल्याने अनेकांची पसंती पर्यटनाला राहिली आहे तर काहींची पसंती नॉनव्हेजला असल्याने आठवडे बाजारात भाज्यांना भाव नसल्याचे चित्र आहे. गत आठवड्यात 40 ते 50 रूपयांना उपलब्ध होणारी मेथीची जुडी वीस रूपयांवर आली आहे. गवारला मात्र मागणी कायम असल्याने एक किलो गवारसाठी शंभर ते एकशेवीस रूपये मोजावे लागत होते. मात्र गिलके, दोडके,कारले, डांगर या वेलवर्गीय भाज्या अवघ्या दहा रूपये पावशेर दराने उपलब्ध होत्या. याशिवाय पालक, शेपू यांनाही विशेष मागणी नव्हती. पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने कांदा भाव खावून गेला. 

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे- 

वांगे- 30 ते 40 रूपये किलो. 
टोमॅटो- 50 ते 60 रूपये किलो. 
कांदा- 40 ते 50 रूपये किलो. 
कोबी गड्डा- 10 रूपये. 
फ्लॉवर- 10 ते 15 रूपये. 
गवार- 100 ते 120 रूपये किलो. 
मेथीची जुडी- 20 ते 30 रूपये. 
पालक - 10 रूपये. 
शेपूृ- 10 रूपये. 
भेंडी- 40 रूपये किलो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no buyer in the market because of the diwali