शासनाला दुष्काळासाठी अजून किती पुरावे हवेत

yeola
yeola

येवला - तालुक्यात २३ गावे व १९ वाड्या-वस्त्यांना १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. खरिपाची अंदाजे ८०-९० टक्के पिके वाया गेली असून यापेक्षा मोठा कोणता पुरावा शासनाला हवा आहे. चुकीच्या सर्वेक्षणाने तालुक्याला दुष्काळी यादीतून वगळले आहे. दुष्काळ जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा येथील शिवसेनेने आज दिला. शिवसेनेने तालुका दुष्काळी जाहीर करणे, पालखेड कालव्याला दोन आवर्तने सोडण्यासह इतर समस्या वारंवार शासनाकडे मांडल्या आहेत. मात्र दुर्लक्ष करून प्रशासन तोडाला पाने पुसत असल्याने निर्ढावलेल्या सरकारच्या निषेधार्थ तहसील कार्यल्यावर शिवसेनेच्या वतीने सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी तत्काळ दखल घेतली.त्यानुसार तहसीलदार रोहिदास वारूळे, पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांनी आंदोलन स्थळी येऊन आमदार नरेंद्र दराडे, सहसंपर्क प्रमुख पवार, उपजिल्हा प्रमुख भास्कर कोंढरे, तालुका प्रमुख रतन बोरणारे, शहर प्रमुख राजेद्र लोणारी आदीशी चर्चा केली. तहसीलदार वारुळे यांनी आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी उपसभापती रूपचंद भागवत, जिल्हा समन्वयक कुणाल दराडे, वाल्मिक गोरे, शरद लहरे, प्रविण गायकवाड, मंगेश भगत, भाऊसाहेब गरूड, कांतीलाल साळवे, दिपक जगताप, प्रसाद पाटील, विजय शिंदे, दत्ता आहेर, दिलीप मेगाळ, संजय कसार, विठ्ठल आठशेरे, पी.के.काळे, जगन बोराडे, संजय पगारे, छगन आहेर, पुडंलिक पाचपुते, शिवाजी वडाळकर, विठ्ठल महाले, राउसाहेब नागरे, भागीनाथ थोरात, जगन मुढे, पांडूरंग शिंदे,दिनेश आव्हाड, भास्कर येवले, भावराव बोरणारे, गणेश पेढारी, अशोक आव्हाड, राहुल लोणारी, धिरज परदेशी, आनद आहेर, संजय सालमुठे, दतु देवरे, बापु गायकवाड, शरद कुदळ,सग्राम मेगाळ, जनार्दन भवर, जनार्दन खिल्लारे, शिवाजी धनगे, अरूण शेलार, सुभाष शिरसाठ, शाम गुंड, विलास काटे, गोरख आहीरे आदी उपस्थित होते.

“दुष्काळ जाहीर करण्याचे निकष अजबच आहेत.कायमस्वरूपीचा दुष्काळी तालुका दुष्काळी नसल्याचा जावई शोध हास्यास्पद आहे.सत्तेत असून सत्तेतील लोकांनाच या शासनाने सापत्नभावाची वागणूक दिली आहे. भयावह दाहकता असतांना तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश होत नाही, ही शरमेची बाब आहे.” 
- नरेंद्र दराडे,आमदार

स्थिती गंभीर असल्याने दुष्काळ जाहीर करावा.पालखेड डावा कालव्याला दोन आवर्तने द्यावीत व तालुक्यातील नादुरुस्त विद्युत रोहीत्रे त्वरीत बदलून द्यावी. रोहीत्रांसाठी कोणी पैसे मागत असल्यास त्वरीत माहीती द्यावी. या तीन मागण्यांसाठी या पुढे ठिय्या आंदोलन न करता तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभारू.”
- संभाजीराजे पवार, सहसंपर्क प्रमुख, येवला

“पाणी आवर्तना बाबत पालखेड कालव्यावर आज बैठक होत असुन त्यावर निर्णय होणार आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठीच्या सर्व दस्तवेज आम्ही तयार करून ठेवले असून त्याची पुर्तता करणार आहे.” 
- रोहिदास वारुळे, तहसीलदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com