भुजबळांच्या काळात जिल्हा असा उघड्यावर नव्हता!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

येवला : पालकमंत्री दमदार असेल तर जिल्ह्याच्या वाट्याला हाल येत नाही. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ पालकमंत्री असतांना जिल्ह्यासह येवल्याला पाणी व दुष्काळासाठी रस्त्यावर येण्याची वेळ येत नव्हती अशी आठवण सांगत तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, पालखेडचे रब्बीसाठी आवर्तन मिळावे आदि मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस अॅड. माणिकराव शिंदे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केली.

तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. येथील भुजबळ संपर्क कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. हातात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसह विविध मागण्याचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या सभेत बोलतांना नेत्यांनी भुजबळांच्या कार्यकाळातील आठवणी सांगत शासनाच्या सरकार विरोधी धोरणांवर टीका केली. यावेळी कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर घोषणा देत ठिय्या आंदोलनही केले.

यावेळी तहसीलदार रोहीदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले. अल्प पर्जन्यमान, पिकांचे प्रचंड नुकसान व टंचाईची तीव्रता ध्यानात घेऊन दुष्काळ जाहीर करावा, धरणात पाणी असल्याने रब्बीसाठी दोन आवर्तने द्यावीत, सक्तीने होणारी विजबील व बँकाची कर्जवसुली थांबवावी, जनावरांना चारा-पाण्याची सुविधा करावी, टंचाई असेल तेथे तत्काळ टँकर सुरु करण्यासह टँकर सुरु करण्याचे अधिकारी तहसिलदारांना द्यावेत आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

यावेळी पगार शिंदे, सहकार नेते अंबादास बनकर, अरूण थोरात, वसंतराव पवार, यशवंत शिरसाठ, अकबर शाह, विजय पवार, ज्ञानेश्‍वर शेवाळे, साहेबराव मढवई, उषाताई शिंदे, संजय बनकर, हरीभाऊ जगताप, रामदास काळे, महेंद्र काले, किसनराव धनगे, प्रकाश वाघ, मोहन शेलार, अशोक मेंगाणे, दिपक लोणारी, अविनाश कुक्‍कर, हुसेन शेख, भाऊसाहेब बोचरे, विष्‍णू कऱ्हेकर, रियाज मुलानी, साहेबराव आहेर, अनिल दारुंटे, शामा श्रीमाळ, निर्मला थोरात, अलका जेजुरकर, समिना शेख, विमलबाई शाह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: There was no drought in the district during Bhujbal period