लग्न ठरवताय?..अन् तेही 'या' टेस्टशिवाय.. 

marriage.jpg
marriage.jpg

नाशिक : 'शादी मोतीचूर का लड्डू जो खाये पछताए, जो न खाए पछताए'.. लग्न म्हटले की, महत्वाचा आणि सुखकर असा अपघातच जणू. अठरा वर्षे मुलगी झाली व मुलगा स्वत: कमवता झाला की घरात लगीनघाई सुरु होते. एका अनोळखी व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य घालवायला लागणार म्हणून धास्ती तर असतेच परंतू मनात हूरहूर देखील असते. प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक महत्त्वाचा सोबतच प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदमयी टप्पा म्हणजे लग्न.

आयुष्याच्या वाटेवर एक नवे वळण

आयुष्याच्या वाटेवर एक नवे वळण आणि त्या वळणावरती आलेल्या प्रत्येक सुख-दुखांत साथ देण्यासाठी एक नवी सोबत मिऴत असते. त्यामुऴे आयुष्यात येणारा हा सोबती योग्य असणे अत्यंत गरजेचे आहे. स्वभाव, रंग, पगार हे सवर् लग्नाच्या वेळेस बघितले जाते पण वैद्यकीय चाचण्या ? 


आरोग्यविषयक समस्या टळू शकतात

लग्न जुऴवत असतांना कुंडली, घर, मालमत्ता बघण्याआधी वधू-वराची वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या पाहिजेत, ते अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून लग्नानंतर होणाऱ्या अनेक आरोग्यविषयक समस्या टळू शकतात किंवा भविष्यात येणाऱ्या टाऴल्या जाऊ शकतात.

लग्नाआधीच सावधानता बाऴगणे आवश्यक

लग्नानंतरच्या आरोग्याच्या समस्यावर वेळीच उपचार करता येतो. लग्नसंस्था, कुटुंबसंस्था टिकवायची असेल तर लग्न या गोष्टीकडे बदलत्या काळानुसार आणि बदलानुसार पाहणे आणि ते स्वीकारणे हेही गरजेचे आहे. लग्नानंतर समस्यांना तोंड देण्यापेक्षा आधीच सावधानता बाऴगणे आवश्यक आहे.


काही वैद्यकीय चाचण्या खालीलप्रमाणे...

एसटीडी चाचणी ​

दोन्ही जोडीदारांनी ही टेस्ट करायला हवी. जेणेकरून लग्नानंतर दोघेही लैंगिक संसर्गाला बळी पडणार नाहीत. कारण, दोघांपैकी एखाद्यास काही झाले तर  दुसऱ्याला देखील तो आजार होऊ शकतो. जी नंतर एक गंभीर शारीरिक समस्या बनू शकते. तसेच, रक्त विकार तपासणी करायला हवी. दोघांचे रक्त तपासणे आवश्यक आहे. या तपासणीमुळे शरीरात आरएच फॅक्टरची सकारात्मकता किंवा नकारात्मकता शोधणे सोपे जाते.

इनफर्टिलिटी स्क्रीनिंग

लग्नानंतर एखाद्या महिलेला मूल होत नाही म्हणून तिलाच दोष दिला जातो. मात्र, बाळ होणे हे काही तिच्या एकटीच्या हातात नसते. हे दोघांवरही अवंलबून असते. त्यामुळे लग्नाच्या आधी दोघांनाही इनफर्टिलिटी स्क्रीनिंग टेस्ट करायला हवी. लग्न ऊशीरा होण्याच्या कारणाने स्त्रियांचे ओव्हरीचे प्रमाण कमी होत असते. त्यामुळे, लग्नापूर्वी स्त्रियांनी ओव्हरीची तपासणी करावी, जेणेकरून लग्नानंतर कुटुंब
नियोजन करणे सोपे जाते. उशिरा लग्न झाले तर कधी कधी आई होण्याची शक्यता कमी असते, ही चाचणी केल्यास आई होण्याची क्षमता कळते.

जेनेटिक चाचणी

लग्नापूर्वी दोन्ही जोडीदारांनी अनुवांशिक चाचणी करून घ्यायला हवी. या चाचणीतून आपल्या जोडीदारास भविष्यात एखादा अनुवांशिक रोग होऊ शकतो का, याची 
माहिती मिळते. कोणताही रोग आढळल्यास त्यावर वेळेत उपचार करता येतो. त्याचप्रमाणे पुरुषांचीही वीर्य चाचणीदेखील करायला हवी. मूल होण्यास पूर्णपणे सक्षम 
आहे की नाही यावरुन कळते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com