PHOTO : ऍपलचे शोरूम फोडले...सुरक्षारक्षकांचा वावर असूनही 'अशी' केली चोरांनी हिम्मत..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

पहाटे साडेपाच ते सकाळी सहादरम्यान चार ते पाच चोरटे शोरूमच्या शटरसमोर आले. त्यांनी शोरूमच्या शटरसमोर चादरी आडव्या धरून इलेक्‍ट्रिकल शटर उचकटले आणि आत प्रवेश केला. चोरट्यांनी ऍपल आयफोनचा सीलबंद बॉक्‍स आणि ऍपलचे स्मार्ट वॉच उचलून नेले.

नाशिक : गंगापूर रोडवरील प्रसाद मंगल कार्यालय सर्कलजवळ असलेल्या ऍपल आयफोनचे "इलेमेन्ट' या शोरूमचे शटर पहाटे उचकटून चोरट्यांनी रोकड अन्‌ आयफोन असा 75 हजारांचा मुद्देमाल लांबविला. विशेषत: या शोरूमच्या शेजारी ज्वेलरी शॉप, हॉस्पिटल असताना आणि त्याठिकाणी सुरक्षारक्षकांचा सातत्याने वावर असतानाही चोरट्यांनी केलेल्या या घरफोडीबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

अशी केली चोरांनी हिम्मत...

ऍपल आयफोनचे इलेमेन्ट शोरूमचे कर्मचारी योगेश आहिरे (रा. सातपूर कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. बुधवारी (ता.11) पहाटे साडेपाच ते सकाळी सहादरम्यान चार ते पाच चोरटे शोरूमच्या शटरसमोर आले. त्यांनी शोरूमच्या शटरसमोर चादरी आडव्या धरून इलेक्‍ट्रिकल शटर उचकटले आणि आत प्रवेश केला. चोरट्यांनी ऍपल आयफोनचा सीलबंद बॉक्‍स आणि ऍपलचे स्मार्ट वॉच उचलून नेले. शोरूममध्ये महागडे स्मार्ट टीव्हीसह ऍक्‍सेसेरीज होते. चोरट्यांनी 63 लाख 71 हजार 500 रुपयांचे 82 ऍपलचे आयफोन, दोन लाख 17 हजार 700 रुपयांचे 13 ऍपल कंपनीचे हेडफोन, सात लाख 57 हजार 300 रुपयांचे 17 ऍपलचे स्मार्ट वॉच आणि काउंटरमधील एक लाख 83 हजार 600 रुपयांची रोकड असा 75 लाख 30 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल चोरला. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. 

Image may contain: one or more people and outdoor

नाशिक : गंगापूर रोडवरील घरफोडी झालेले ऍपलचे इलेमेंन्ट शोरूम. 

नक्की बघा > PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...

75 लाखांचा ऐवज लंपास..आयुक्तांकडून पाहणी 
पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील दोन दिवसांच्या सुटीनंतर हजर झाले असताच, पहाटे अवघ्या अर्धा तासात झालेल्या पाऊण कोटीच्या घरफोडीने चोरट्यांनी सलामी दिल्याची चर्चा आहे. आयुक्तांनी घटनेची माहिती मिळताच इलेमेंन्ट शोरूमला भेट देत पाहणी केली. गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना केल्या. तसेच, या शोरूमबाहेर आणि आसपास असलेल्या ज्वेलरी शॉप व हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. यात कैद झालेल्या संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.  

Image may contain: indoor

नाशिक : गंगापूर रोडवरील घरफोडी झालेले ऍपलचे इलेमेंन्ट शोरूम.

हेही वाचा > पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने..

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves stole goods from Apple's showroom Nashik Crime Marathi News