VIDEO : हिम्मत तर बघा या चोरांची..चक्क 'इतका' लंपास केला ऐवज..

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 8 November 2019

अभोणा येथील भरवस्तीत असलेल्या माउली ज्वेलर्स तीन चोरट्यांनी फोडून चार फुटी सहाशे किलो वजनाच्या तिजोरीसह दागिने पळवून नेले. ही घटना गुरुवारी (ता. ३) रात्री तीनच्या सुमारास घडली. हा प्रकार पहाटे लक्षात येताच माउली ज्वेलर्सचे संचालक उमेश दुसाने यांनी पोलिसांना माहिती दिली. कनाशी येथे रात्री चोरट्यांनी किराणा दुकान फोडून रोकड नेल्याचे समजते. अभोणा पोलिसांनी तत्काळ ठसेतज्ज्ञ व श्‍वानपथकास पाचारण करून घटनास्थळाची पाहणी केली

नाशिक : अभोणा येथील भरवस्तीत असलेल्या माउली ज्वेलर्स तीन चोरट्यांनी फोडून चार फुटी सहाशे किलो वजनाच्या तिजोरीसह दागिने पळवून नेले. ही घटना गुरुवारी (ता. ३) रात्री तीनच्या सुमारास घडली. हा प्रकार पहाटे लक्षात येताच माउली ज्वेलर्सचे संचालक उमेश दुसाने यांनी पोलिसांना माहिती दिली. 

No photo description available.

सीसीटिव्हीच्या आधारे सापडले चोर.. 

दरम्यान, कनाशी येथे रात्री चोरट्यांनी किराणा दुकान फोडून रोकड नेल्याचे समजते. 
अभोणा पोलिसांनी तत्काळ ठसेतज्ज्ञ व श्‍वानपथकास पाचारण करून घटनास्थळाची पाहणी केली. चोरट्यांनी दुकानाबाहेरील लोखंडी चॅनेल गेट व शटरचे कुलूप पहार व कटरच्या सहाय्याने तोडून आत प्रवेश केला. आतील काउंटर बाजूला सरकवून चार फुटी व सहाशे किलो वजनाची तिजोरी लंपास केली. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन चोर तोंडाला रुमाल बांधून बोलेरो गाडीतून घेऊन गेल्याचे कैद झाले आहे. तिजोरीत दोन लाख 50 हजारांची 100 ते 120 ग्रॅम सोन्याची मुरणी, मंगळसूत्र, डोरले, मणी, तसेच एक लाखाचे दीड-दोन किलो चांदीचे जोडवे, साखळी, वाळे, मासळी, कडे आदी दागिने होते. लोखंडी लॉकर 15 हजार असा एकूण तीन लाख 65 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. दोन वर्षांपूर्वी चोरट्यांनी हेच दुकान फोडण्याचा प्रयत्न केला होता. या चोरीप्रकरणी येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

सहाशे किलोच्या तिजोरीसह दागिन्यांची चोरी 
चोरांचा शोध घेऊन त्यांना कडक शासन व्हावे व माझे झालेले नुकसान वसूल व्हावे. झळ सोसून ग्राहकांना त्यांचे दागिने द्यावे लागणार आहेत. -उमेश दुसाने, संचालक, माउली ज्वेलर्स, अभोणा 

चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन कडक शासन केले जाईल. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. - उमाकांत गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक, अभोणा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thieves stole jewelery from jewelers Nashik News