सोने घरातच सोडुन तीस हजाराची रोकड केली लंपास 

दीपक कच्छवा
सोमवार, 19 मार्च 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) : सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातील कपाटातील तीन तोळे सोने सोडुन फक्त तीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना पळासरे (ता.चाळीसगाव) येथे नुकतीच घडली.

पळासरे येथील सेवानिवृत्त शिक्षक जिजाबराव देवकर हे चाळीसगाव येथे आपल्या मुलाकडे गेले होते. बंद असलेल्या घरातुन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाट तोडुन त्यात असलेली तीन तोळा सोन्याची पोत अशीच राहु दिली. मात्र तीस हजाराची रोकड लंपास केली. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: thirty thousand stolen without gold chalisgao robbery