'मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची गय केली जाणार नाही'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

सिडको - छावा संघटना ही सर्व जातीधर्माला सामावून घेणारी संघटना आहे. केवळ मराठा आरक्षण हा एकमेव मुद्दा संघटनेने उचलून धरलेला नाही, तर त्याचबरोबर शेतमालाला योग्य भाव मिळावा, काबाडकष्ट करणाऱ्यांना न्याय मिळावा या भावनेतून संघटना काम करीत आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची आगामी काळात गय केली जाणार नाही, अशा इशारा छावा संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी दिला. संघटनेच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे मराठा मित्र पुरस्कार व शिवजिजाऊ पुरस्काराच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. 

पवननगर येथील मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास छावाचे प्रदेशाध्यक्ष भीमराव मराठे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे, सुरगाणा संस्थानच्या सोनालीराजे पवार, सचिन मराठे, महेश बडवे, शिवा भागवत, महिला आघाडीच्या संगीता मुरकुटे, निवृत्ती दातीर, पवन मटाले उपस्थित होते. या वेळी संघटनेतर्फे मराठा मित्र पुरस्कार नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना प्रदान करण्यात आला, तर नीलेश राणे, संगीता सोनवणे, दीपक चव्हाण, विलास जाधव, योगेश चुंभळे, डॉ. तुषार शिंदे, रवी पवार, संजय फटांगरे, रवींद्र दातीर, नितीन रोटे-पाटील, चंद्रकांत बनकर, दर्शन पाटील, बाळू गीते, मनीषा हिरे, संजीवनी जाधव आदींना शिवजिजाऊ पुरस्काराने गौरविण्यात आले. छावाचे शहराध्यक्ष योगेश गांगुर्डे यांनी प्रास्तविक केले. जिल्हाध्यक्ष आशिष हिरे यांनी स्वागत केले. राजेश बेदमुथा यांनी सूत्रसंचालन केले. 

भुजबळांना सोडणार नाही 
मराठा आरक्षणाला खरा विरोध नाशिकमधूनच झाला असून, विरोध करणारे छगन भुजबळ यांना तुरुंगात जावे लागले आहे. असे सांगून आगामी काळात श्री. भुजबळ यांना छावा संघटना सोडणार नाही, अशी खंबीर भूमिका प्रदेशाध्यक्ष भीमराव मराठे यांनी या वेळी जाहीर केली. 

सिडको : छावा मराठा संघटनेतर्फे मराठा मित्र पुरस्कार सुधाकर बडगुजर यांना देताना नानासाहेब जावळे-पाटील. शेजारी भीमराव मराठे, विजयकुमार घाडगे, महेश बिडवे, सचिन मराठे, योगेश गांगुर्डे, सोनालीराजे पवार. 

Web Title: Those who oppose Maratha reservation will not be missed