पेस्ट कंट्रोलचा बहाण्याने लांबविल्या सोन्याच्या बांगड्या

Threaded gold bangles by pasting the paste control
Threaded gold bangles by pasting the paste control

नाशिक : कधी महापालिकेचा तर कधी वीज कंपनीचा कर्मचारी असल्याची बतावणी करत घरात शिरून चोरी करणाऱ्या दोघांना नाशिक पोलीसांनी गजाआड केले. त्यातील एकाने पेस्ट कंट्रोल कामगाराचा बहाणा करून घरात शिरला आणि सव्वा लाखांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याच प्रकार घडला आहे. 

गंगापूर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
ज्योती संजय बावीस्कर (रा. एकदंत अपार्टमेंट, गोंदवलेकर महाराज मंदिराजवळ, चैतन्यनगर, गंगापूररोड) यांच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्योती बावीस्कर यांच्या फ्लॅटमध्ये पेस्ट कंट्रोलचे काम करण्यासाठी मनुष्य पेस्ट कंट्रोल संस्थेचा कामगार संतोष केरबा कांबळे हा संशयित सोमवारी (ता.4) सकाळी 8 वाजेच्या सुमारास आला. त्याने ज्योती बावीस्कर यांच्या घरामध्ये पेस्ट कंट्रोलचे काम करीत असताना, 
त्यांच्या 1 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 6 तोळ्याच्या सोन्याच्या चार बांगड्या त्यांची नजर चुकवून लंपास केल्या. सदरची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी गंगापूर पोलिसात धाव घेत संशयित कांबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. 

संशयित कांबळे पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी आडगाव, म्हसरुळ, पंचवटी आणि नाशिकरोड परिसरात वीज कंपनी वा महापालिकेचा कर्मचारी असल्याची बतावणी करून घरात शिरणे आणि सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या दोघांना गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली होती. तर आता संशयिताने पेस्ट कंट्रोलच्या बहाण्याने घरातून घुसून चोरी केली आहे. 


संशयित कांबळे हा सराईत गुन्हेगार असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सदरचा इसम कुठेही दिसला तर पोलिसांच्या 100 क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा.  लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com