वाळूमाफियाची तहसिलदाराला धमकी 

वाळूमाफियाची तहसिलदाराला धमकी 

नाशिक - नाशिकरोड परिसरातील अश्‍विनी कॉलनीमध्ये वाळूची बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्या डंपरला नाशिकचे तहसिलदारांनी रोखले असता, संशयित वाळू माफियाने शिवीगाळ करीत डंपरमधून लोखंडी टॅमी काढून धमकावल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित वाळू माफिया तुषार उत्तम सानप (रा. कऱ्हे, ता. सिन्नर, जि. नाशिक) याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा व धमकावल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाशिक तालुक्‍याचे तहसिलदार शिवकुमार आवळकंठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अश्‍विनी कॉलनीमध्ये वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या डंपरची खबर महसुल विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार रविवारी (ता.16) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तहसिलदार शिवकुमार आवळकंठे हे भरारी पथकासह घटनास्थळी पोहोचले. पथकाने बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा डंपर (एमएच 02 वायए 9779) या वाहनाला अडविले आणि कायदेशीर कारवाई करीत, सदरच्या डंपरचालकाला डंपर नाशिक तहसिल कार्यालयात घेऊन जाण्याचे आदेश दिले. त्यावेळी डंपरचा मालक संशयित तुषार सानप याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने तहसिलदार आवळकंठे यांच्या कारवाईला विरोध केला. संशयित सानप याने यावेळी डंपरच्या कॅबिनमधून लोखंडी टॅमी काढून तहसिलदारांसह पथकावर शिवीगाळ करीत धावून आला आणि तुम्ही येथून निघून जा नाहीतर तुमचा बेत पाहिल अशी धमकी दिली. संशयिताने त्याचठिकाणी वाळूचा उपसा केला आणि डंपरसह पोबारा केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com