शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी साडेतीन कोटीचा निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

अठरा रस्ते होणार गुळगुळीत; निविदा प्रक्रिया लवकरच

जळगाव - राज्यातील महापालिकेच्या हद्दितील रस्त्यांना राज्यशासनाकडून रस्ते अनुदान व विशेष रस्ते अनुदान दिले जाते. या अंतर्गत जळगाव शहरातील १८ रस्त्यांना शासनाचा ३ कोटी ७५ लाख रुपयाचा निधी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत मंजूर झाला असल्याची माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली.

अठरा रस्ते होणार गुळगुळीत; निविदा प्रक्रिया लवकरच

जळगाव - राज्यातील महापालिकेच्या हद्दितील रस्त्यांना राज्यशासनाकडून रस्ते अनुदान व विशेष रस्ते अनुदान दिले जाते. या अंतर्गत जळगाव शहरातील १८ रस्त्यांना शासनाचा ३ कोटी ७५ लाख रुपयाचा निधी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत मंजूर झाला असल्याची माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली.

शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था दयनीय झाली होती. महापालिकेतर्फे वसुली झालेल्या दोन कोटी रकमेतून शहरातील रस्त्यांचे पॅचअप व दुरुस्तीच्या कामांना सोमवार पासून सुरवात झाली आहे. त्यातच आज राज्यशासनाकडून शहरातील १८ रस्त्यांना ३ कोटी ७५ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. यात रस्ते अनुदानात दोन रस्ते तर विशेष रस्ते अनुदानात सोळा रस्ते अनुदानात बारा रस्ते व ए रस्त्यांच्या कामांचे निविदा प्रक्रिया लवकरच राबवली जाणार असल्याचे महापौर लढ्ढा यांनी सांगितले.

इच्छादेवी ते डीमार्ट पर्यंत दुभाजक
राज्यशासनाच्या विशेष रस्ते दुरुस्तीच्या निधीत राष्ट्रीय महामार्ग ६च्या ईच्छादेवी चौक ते शिरसोलीकडे जाणारा रस्त्यावरील डीमार्ट चौकापर्यंतच्या रस्त्यामध्ये दुभाजक बांधण्याच्या कामाला निधी मिळाला आहे. १३ लाख १३ हजार ८०६ रुपये निधी मिळाले आहे.  

बळीराम पेठ चौकाची रुंदी वाढेल
बळीराम पेठ चौकातील अतिक्रमण काढण्यात आले होते. त्यानुसार या रस्त्याचे काम होणार असून पुर्वी ९ मीटरचा असलेला रस्ता आता १४ मिटर पर्यंतची रुंदी वाढणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. 

हे रस्ते होणार दुरुस्त.....
१) का.ऊ. कोल्हे विद्यालय ते कालंका माता मंदिर
२) रेल्वे स्टेशन दत्त डेअरी ते बळिराम पेठ चौक
३) योगेश्‍वर नगर प्रभाग क्रमांक २३
४) कोल्हे नगरातील पोलिस ठाणे ते प्लॉट नंबर ३ पर्यंत 
५) आशाबाबा नगर प्लॉट क्रमांक १ ते २५ पर्यंत
७) ऑटोनगर मधील रस्ता
८) प्रभाग क्रमांक २३ तुळसाई नगर ते सागर नगर
९) प्रभाग क्रमांक ११ मधील भोईटे नगर 
१०) वाघुळदे नगर ते भिकमचंद जैन नगर
११) निमखेडी गट नंबर ८५ ते ८९ पर्यंत
१२) पिंप्राळा गट नंबर २/ २अ प्लॉट नंबर ४ ते १७ पर्यंत
१३) रुख्मा टेंट हाऊस ते सेंट लॉरेन्स स्कूल पर्यंत
१४) शिनु कॉम्प्लेस (नेरीनाका) ते मुस्लीम कब्रस्तान पर्यंत
१५) काव्य रत्नावली चौक ते गिरणा टाकी पर्यंत
१६) पंचमुख हनुमान-मंदिर ते साई मेडिकल पर्यंत
१७) जळगाव पेट्रोल पंप ते पांझरपोळा चौक पर्यंत
१८) मेहरुण शिवार ४७२/४ मधील रस्ता 
१९) प्रभाग २५ मधील ईश्‍वर कॉलनीतील रस्ता

Web Title: Three crore in grant funds to repair roads