मलकापूरजवळ अपघातात भुसावळचे तीन जण ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

भुसावळ - भरधाव स्कॉर्पिओ जीपचे पुढील टायर फुटल्याने ती उलटून भुसावळच्या तिघांचा जागीच मृत्यू झाला; तर पाच जण जखमी झाले. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास मलकापूरनजीक (जि. बुलडाणा) महामार्गावर घडली. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे.

भुसावळ - भरधाव स्कॉर्पिओ जीपचे पुढील टायर फुटल्याने ती उलटून भुसावळच्या तिघांचा जागीच मृत्यू झाला; तर पाच जण जखमी झाले. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास मलकापूरनजीक (जि. बुलडाणा) महामार्गावर घडली. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे.

शहरातील खडका रोडवरील मुस्लिम कॉलनीतील खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे खान कुटुंबातील सर्व सदस्य या जीपमधून भुसावळला येत होते. जखमींना जिल्हा रुग्णालय व भुसावळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

येथील माजी नगरसेवक आरिफ गनी यांच्या मालकीची स्कॉर्पिओ जीपमधून (एमएच 19 एपी 9130) मुस्लिम कॉलनीतील खान कुटुंब लोणार सरोवर (जि. बुलडाणा) येथे नातेवाइकांकडे कार्यक्रमासाठी काल भुसावळहून गेले होते. कार्यक्रम आटोपून परतताना मलकापूरनजीक जीपचे पुढील टायर फुटल्याने चालक अफजल खान सलीम खान (वय 24, रा. आगाखान वाडा), जुबिया मुश्‍ताक खान (वय 12), मुदस्सीर इम्रान खान (वय 10) यांचा जागीच मृत्यू झाला; तर रेल्वे कर्मचारी इद्रिस खान, अमीर खान ऊर्फ छोटू यांच्यासह एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले. मृत जुबिया खान ही रजा हुसेन हायस्कूलची, तर मुदस्सीर खान हा एम. आय. तेली स्कूलचा विद्यार्थी आहे. चालक अफजल खान याचे नुकतेच लग्न ठरले होते, पण लग्नाआधीच त्याची मृत्यूशी गाठ पडली. आमीर खान यांची पत्नी गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले.

बालिका बचावली
जीपमध्ये सव्वा महिन्याची बालिका आई-वडिलांसह प्रवास करीत होती. अपघातानंतर आई-वडील जखमी झाले. मात्र, संबंधित बालिकेस काहीही इजा झाली नाही. "देव तारी त्याला कोण मारी'चा प्रत्यय आल्याची चर्चा घटनास्थळी होती.

Web Title: three death in accident