जळगावमध्ये तीन मुलांचा बुडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

यश राहुल ठाकूर (वय 15), रोहित राहुल ठाकूर (वय 15) आणि आकाश सुभाष चौधरी (वय 14) या तीन मुलांचा मृत्यू झाला. या तिघांनाही पोहता येत होते. मात्र, धरणातील गाळ काढला असल्याने पाण्याचा अंदाज त्या तिघांना आला नसल्याने ते बुडाले

जळगाव : एरंडोल येथील तिघा मुलांचा जवळच असलेल्या अंजनी धरणात बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज (सोमवार) घडली. या दुर्घटनेत जुळ्या भावांचाही मृत्यू झाला. 

यश राहुल ठाकूर (वय 15), रोहित राहुल ठाकूर (वय 15) आणि आकाश सुभाष चौधरी (वय 14) या तीन मुलांचा मृत्यू झाला. या तिघांनाही पोहता येत होते. मात्र, धरणातील गाळ काढला असल्याने पाण्याचा अंदाज त्या तिघांना आला नसल्याने ते बुडाले, असे सांगितले जात आहे. जवळच्या धारागिर, पलसदड गावातील भिल्ल मुलांना मृतदेह बाहेर काढले. या घटनेमुळे येथील काळकर गल्लीवर शोककळा पसरली आहे. 

Web Title: Three drowned in Erandol, Jalgaon

टॅग्स