गुजरात राज्यात चोरट्या मार्गाने नेणारा तीन लाखाचा मद्यसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक दिंडोरी 3 व वणी पोलिसांना गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या खबरीनुसार मद्याचे बॉक्स भरलेले वाहन ननाशी बाजुकडून करंजखेड फाट्यामार्ग सापुताऱ्याकडे जात असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी करंजखेड येथे सापळा लावण्यात आला होता.

वणी (नाशिक) - करजंखेड, ता. दिंडोरी शिवारात चोरटया मार्गाने गुजरात मध्ये विदेशी दारू घेऊन जाणारी गाडी राज्य उत्पादन शुल्क दिंडोरी भरारी पथक 3 व वणी पोलीसांनी जप्त केली असुन सुमारे तीन लाख 45 हजाराच्या मद्यासह तेरा लाखांचा 45 हजारांचा पंचेचाळीस हजारांचा एेवज जप्त केला आहे. दरम्यान वाहन चालक गाडी सोडून पळून गेला आहे.

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक दिंडोरी 3 व वणी पोलिसांना गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या खबरीनुसार मद्याचे बॉक्स भरलेले वाहन ननाशी बाजुकडून करंजखेड फाट्यामार्ग सापुताऱ्याकडे जात असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी करंजखेड येथे सापळा लावण्यात आला होता. तसेच ग्रामस्थांना याबाबत सांगण्यात येऊन वाहन अडवून ठेवण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार आज ता. 18 दुपारी एक वाजेच्या दरम्यान पेठ ननाशी रस्त्याकडून जी जे 01 के आर 2597 क्रमांकाची महिंद्रा कंपणी एक्सयुव्ही गाडी येत होती. संशयास्पद गाडी दिसल्याने ग्रामस्थांनी गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी चालकाने गाडी न थांबविल्याने ग्रामस्थांनी पाठलाग केला. यावेळी गाडी भरधाव वेगाने नेऊन रस्ता सोडून देत त्याच गाडीच्या मागुन येणाऱ्या गाडीत बसून चालक फरार झाला. दरम्यान पोलिस व राज्य उत्पादन शुल्क कर्मचारी पोहचले तो पर्यंत चालक फरार झाला. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजाराची विदेशी दारू व दहा लाख रूपये किमंतीची महिंद्रा कंपणीची गाडी असा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक एस. व्ही. देशमुख, सहा निरीक्षक गरूड, काॅ. अवधुत पाटील, संजय सोनवणे, महेश खामकर, महेश सातपुते, लोकेश गायकवाड, वणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रंगनाथ सानप, पोलिस उप निरीक्षक गणेश सुर्यवंशी व नितीन पाटील, पोलिस हवालदार नागरे, झाडे, चव्हाण, शार्दुल, धुळे, गायकवाड, वाहन चालक बच्छाव अादीनी सहभाग घेेेेतला. दरम्यान या मार्गावरून मद्याच्या अजून दोन गाडया गेल्या असल्याची चर्चा नागरिकांत होती. गुजरात राज्यात दारुबंदी असल्याने चोरटया मार्ग गुजरातला मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक होत असते.

Web Title: Three lakh liters of liquor was seized in the state of Gujarat