जिल्ह्यात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मे 2020

जिल्ह्यासह राजयात कोरोनाग्रस्तांचा आकाडा वाढतच चालला आहे. देशभरात महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक असून सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच जिल्ह्यात दररोज कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असल्याने नागरिकांकडून अद्यापही गांभीर्य घेतले जात नाही.

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.आज दिवसभरात जिल्ह्यातील 62 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहे. यामध्ये यामध्ये भुसावळ येथील 58 वर्षीय महिलेसह, पाचोऱ्यातील 2 असे एकूण 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या ही 60 वर पोचहली आहे. 

जिल्ह्यासह राजयात कोरोनाग्रस्तांचा आकाडा वाढतच चालला आहे. देशभरात महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक असून सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच जिल्ह्यात दररोज कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असल्याने नागरिकांकडून अद्यापही गांभीर्य घेतले जात नाही. शहरातील कोविड रुग्णालयात घेण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 62 कोरोना संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 59 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दोन व्यक्तींचे अहवाल तपासण्याची कार्यवाही सुरु आहे. तर भुसावळ येथील 58 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत भुसावळातील कोरोनाग्रस्तांची संख्या 11 वर पोहचली आहे. तर पाचोरा येथील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 9 इतकी झाली आहे. 

यांचे आले निगेटिव्ह अहवाल 
आज दुपारच्या सुमारास जिल्हाभरातील 59 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. यामध्ये सम्राट कॉलनी जळगाव येथील कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील पंधरा व्यक्तींचा तर अडावद, येथील कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील 25 व्यक्तींचा समावेश आहे. तसेच भडगाव येथील मृत झालेल्या महिलेच्या तपासणी अहवाल देखील निगेटिव्ह आला असल्याने काही अंशी जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three more corona positive in the district