नाशिक पुणे महामार्गावरील अपघातात तीनजण जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

गुरेवाडी फाट्याजवळ भरधाव मांझा कारच्या अपघातात मायलेकांचा समावेश असून हे तिघे जण जेलरोड, नाशिकरोड येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे.

जेलरोड (नाशिक रोड) - नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर बायपासला गुरेवाडी फाट्याजवळ भरधाव मांझा कारचा (एमएच 04 : ई एक्स : 8632) भीषण अपघात होऊन एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली.

मृतांत मायलेकांचा समावेश असून हे तिघे जण जेलरोड, नाशिकरोड येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. जितू राम अमेसर (चालक, वय अंदाजे 25), त्याची आई सीमा राम अमेसर (वय अंदाजे 45) आणि वर्षा जगदीश अमेसर (वय अंदाजे 40) अशी मृतांची नावे आहेत.

जितू राम अमेसर हा टाटा मांझा ही कार भरधाव चालवत होता. रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि शेजारी असलेल्या डिव्हायडरला धडकली.

अपघातादररम्यान हवेत तीन ते चार गिरक्या घेऊन कार बाजूला नांगरून ठेवलेल्या शेतात पडली. त्यात कारचा चुराडा झाला. तर कारचालक हा सुमारे 300 ते 400 फूट लांब फेकला गेला. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून त्यांचे मृतदेह दोडी बुद्रूक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यास आल्याचे समजते.

Web Title: Three people dead in nasik pune highway accident