स्थागुशाचे फौजदार शेळकेसह सिंदखेडचे तीन पोलिसही निलंबित

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 19 एप्रिल 2018

सत्येंद्रसिंघ उर्फ सत्या चरणसिंघ संधू (वय 26) या युवकाचा खून झाला होता. त्यावेळी इतवारा उप विभागाचे पोलिस उपाधीक्षक अशोक बनकर हे कार्यरत होते.

नांदेड - स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षकासह सिंदखेड ठाण्याच्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलिस उपनिरीक्षक विनायक शेळके हे यापूर्वी इतवारा ठाण्यात कार्यरत होते. ज्यावेळी सत्येंद्रसिंघ उर्फ सत्या चरणसिंघ संधू (वय 26) या युवकाचा खून झाला होता. त्यावेळी इतवारा उप विभागाचे पोलिस उपाधीक्षक अशोक बनकर हे कार्यरत होते. या प्रकरणी रोशनसिंघ माळी, अजितसिंघ माळी, गुरमितसिंघ यांच्यासह सहा जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा इतवारा ठाण्यात दाखल झाला होता. त्या प्रकरणाचे तपासिक अंमलदार विनायक शेळके होते. तपासा दरम्यान त्यांनी माळी बंधूंच्या घराची झडती घेतली आणि त्या घरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले होते. त्यानंतर त्या गुन्ह्यातील तीन आरोपींनी मागितलेल्या जामीन अर्जात या सीसीटीव्ही फुटेजचा उल्लेख करून त्यांना जामीन देऊ नये असी न्यायालयाला विनंती केली होती. 

न्यायालयाने यावर आपले मत दिले होते पण काहीच कार्यवाही केली नव्हती. परंतु या प्रकरणात तपासात गती मिळत नसल्याने विनायक शेळकेवर कार्यवाही झाली आहे. त्यांना निलंबित करण्यात आले आहे. श्री. शेळके हे सुद्धा बुधवारी (ता. 18) पासून आजारी रजेवर गेले आहेत. ज्यावेळी विनायक शेळके यांनी या खून प्रकरणाचा तपासाचा भाग सांभाळला होता तेव्हा त्यात डीवायएसपी अशोक बनकर यांचा हस्तक्षेप होत होता अशी चर्चा पोलिस दलातून एेकावयास मिळत आहे. 

तीन पोलीस कर्मचारी निलंबीत -
जिल्ह्यातील सिंदखेड पोलिस ठाण्यात एका दरोडा प्रकरणातील पोलिस कोठडीत असलेला आरोपी शेख आसिफ याने 11 एप्रिल रोजी सकाळी प्रातर्विधीसाठी जावून दार बंद करून घेतले. आणि ब्लेडने आपला गळा चीरुन आत्हमत्या करण्याचा प्रयत्न केला. अासिफवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत. आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या श्री. कानवार, श्री. कोलबुद्धे आणि शमी कुरेशी या तीन पोलीसांना निलंबिकेले आहेत. हे आदेश पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी जारी केले आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Three police inspectors of Sandkhed were also suspended with Sub Inspector