रुमित केमसिंथ स्फोट प्रकरणी तीन संशयित ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

शिरपूर : शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील रुमित केमसिंथ प्रा.लि. या रसायन उत्पादक कारखान्यात झालेल्या स्फोट प्रकरणात पोलिसांनी शुक्रवार (ता.२७) तीन संशयितांना अटक केली. 

शिरपूर : शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील रुमित केमसिंथ प्रा.लि. या रसायन उत्पादक कारखान्यात झालेल्या स्फोट प्रकरणात पोलिसांनी शुक्रवार (ता.२७) तीन संशयितांना अटक केली. अटक केलेल्या संशयितांमध्ये रुमित केमिसिंथचे संचालक संजय बाबुराव वाघ (६२, रा.नाशिक), साईट इंचार्ज गणेश भानुदास वाघ (३६, रा.अमळनेर) व जनरल मॅनेजर अनिल केशव महाजन (५२, रा.बऱ्हाणपूर ह.मु.शिरपूर) यांचा समावेश आहे.

विशेष चौकशी समितीची स्थापना

३१ ऑगस्टला रुमित केमिसिंथमध्ये रिऍक्टरचा स्फोट झाल्याने १४ कामगार ठार तर ७० जण जखमी झाले होते. शिरपूर पोलिसांत कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित फरार होते. आज संशयित स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाले. सकाळी त्यांची उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या स्फोटाची चौकशी करण्यासाठी शासनाने विशेष चौकशी समितीची स्थापना केली आहे. समितीने नुकतीच घटनास्थळाला भेट दिली असून संबंधितांचे जाब जबाब नोंदवून घेतले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three suspects arrested in Rumit Chemsinth blast case