बसमध्ये तीन महिलांनी केला पैसे लांबविण्याचा प्रयत्न

दीपक कच्छवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) - वरखेडे बसमधून औरंगाबाद येथील तीन महिलांनी पन्नास हजार रुपये लांबविल्याची घटना मेहुणबारे ते दसेगाव दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरखेडे येथुन चाळीसगावला जाणाऱ्या बसमध्ये राजेंद्र पवार हे बसले होता. त्यांच्या बाजुला या तीन महिला बसल्या होत्या. या महिलांनी संधी साधून राजेंद्र पवार यांच्या खिशातून पन्नास हजार रुपये काढले. मात्र काही वेळाने पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी तेथेच आरडाओरडा करून बस पोलिस ठाण्यात आणली ते कळताच त्यांनी पैसे गाडीतच फेकले. 

पुढील कारवाई मेहुणबारे पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या मार्गदर्नाखाली साहाय्यक फौजदार नरेंद्र सरदार करीत आहेत.

Web Title: Three women tried to rob money on the bus